Team India Squad T20 World Cup 2024 Hardik Pandya News Marathi sakal
क्रीडा

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

T20 World Cup 2024 Team India squad hardik pandya : भारतीय क्रिकेट संघ आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा दावेदार मानला जात आहे. या मेगा टूर्नामेंटमध्ये संघ कसा असेल याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Team India squad hardik pandya : भारतीय क्रिकेट संघ आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा दावेदार मानला जात आहे. या मेगा टूर्नामेंटमध्ये संघ कसा असेल याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली. अमेरिका आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली 1 ते 29 जून या कालावधीत टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार याबाबत अनेक बातम्या येत आहेत. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या दिल्लीतील आयपीएल सामन्यादरम्यान मुंबईच्या उपस्थितीने याबाबतची उत्सुकता वाढली. संघाबाबत चर्चा झाली असून सोमवार 29 एप्रिल रोजी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्यावर प्रश्न?

इंडियन प्रीमियर लीगदरम्यान मुंबई इंडियन्सचे कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आणि इंडियन एक्सप्रेसने यापूर्वी एका वृत्तात म्हटले होते की, हार्दिकने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली तरच तो टी-२० संघाचा भाग असेल, अन्यथा संघातून बाहेर होऊ शकतो.

'ही' 9 नावे जवळजवळ निश्चित

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडकर्ते १५ सदस्यीय संघाची घोषणा करतील. यापैकी 9 नावे अशी आहेत ज्यांची निवड निश्चित मानली जात आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांची नावे 100 टक्के निश्चित झाली आहेत. त्याचबरोबर ऋषभ पंतचे यष्टिरक्षक म्हणून पुनरागमन जबरदस्त आहे. गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळणार हेही निश्चित मानले जात आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT