T20 World Cup 2022 
क्रीडा

T20WC पूर्वी हेरगिरी! चहल अश्विनसह डीकेही पाहतोय इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामना

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियात घाम गाळत आहेत. हे 4 भारतीय खेळाडू ENG विरुद्ध AUS चा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी गेली...

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपला 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरवात होणार आहे. संघ तेथे पोहोचताच त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सलग दोन दिवस सराव सत्रात भाग घेतला. भारतीय संघाने सलग दोन दिवस सराव सत्रात भाग घेतल्यानंतर खेळाडूंना रविवारी सुट्टी देण्यात आली. या दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना पाहण्यासाठी काही भारतीय खेळाडू पर्थमध्ये गेले.

टीमचा स्टार फिरकीपटू अश्विनने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तो युजवेंद्र चहल, दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल या खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचा आनंद घेत आहे. भारताच्या 4 खेळाडू त्याच्याविरुद्ध हेरगिरी करत आहे. पहिला सामना पर्थमध्ये खेळला जात असून, तिथे टीम इंडियानेही तळ ठोकला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ आपापसात खेळताना पाहून भारतीय संघातील काही खेळाडूही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले.

विश्वचषकात सहभागी होणारे बहुतांश संघ सध्या स्पर्धात्मक क्रिकेट खेळत आहेत. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यापूर्वी काही सराव सामने खेळणार आहे. रोहित शर्माचे खेळाडू 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील मोहीम सुरू करण्यापूर्वी दोन सराव सामने खेळतील. पर्थ नंतर भारतीय संघ ब्रिस्बेनला जाईल, जिथे ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी दोन अधिकृत सराव सामने खेळतील.

भारतीय संघ 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. रोहितचा संघ 2`7 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक पात्रता फेरीत अ गटातील उपविजेत्या संघाशी भिडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT