t20 world cup in marathi star sports meet raj thackeray 
क्रीडा

मनसेच्या आंदोलनाने स्पोर्ट्स चॅनेल हादरले, अधिकारी पळत पळत राज ठाकरेच्या दरबारी

स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

सकाळ ऑनलाईन टीम

T20 World Cup In Marathi : टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यापूर्वी कोणतीही विश्वचषक स्पर्धा मराठीमध्ये प्रक्षेपित झालेली आपण पाहिली नाही. पण यावर्षी होणारा विश्वचषक मात्र मराठीमध्ये प्रक्षेपित होणार आहे. कारण मराठी भाषेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने याबाबत मोठे आंदोलन केले.

स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतही प्रसारण व्हावे, असा अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आला आहे. अन्यथा मनसे स्टार स्पोर्ट्स वाहिनीला आपल्या पद्धतीने धडा शिकवेल, असा इशारा राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

स्टार स्पोर्टस ही वाहिनी क्रिकेटचा विश्वचषक प्रसारीत करीत आहे. महाराष्ट्रीत लाखो चाहते हा विश्वचषक पाहणार त्यामुळे अन्य प्रादेशिक भाषांमध्ये जर विश्वचषकाचे प्रसारण होत आहे, तर ते मराठीत का होऊ शकत नाही. स्टार स्पोर्ट्स मराठीला दुय्यम वागणून देत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर स्टार स्पोर्ट्सला जागं करण्यासाठी आंदोलन केले.

मनसे आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमते घेत या आंदोलनाला घाबरून थेट राज ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत मनसे दूरसंचार सेनेचे अध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर, सरचिटणीस निर्मल निगड उपस्थित होते. या भेटीत नेमके काय होते आणि आता मराठीत विश्वचषकाची रंगत पाहायला मिळणार का, हे लवकरच सर्वांसमोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरात ६० लाखांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त; १३१ गोवंशांची सुटका, ८ आरोपींवर ४ गुन्हे दाखल

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT