T20 World Cup IND vs PAK sakal
क्रीडा

T20 World Cup : मैदानात उभे राहूनही पाहू शकता IND vs PAK सामना; जाणून घ्या किंमत

ICC T20 World Cup सुरू होण्यास अजून दोन महिने बाकी आहेत. मात्र विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत

Kiran Mahanavar

T20 World Cup India vs Pakistan : ICC T20 World Cup सुरू होण्यास अजून दोन महिने बाकी आहेत. मात्र विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 23 ऑक्टोबर रोजी MCG येथे होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक सामन्यासाठी स्थायी तिकिटे जारी केली आहेत. हा सामना पाहण्यासाठी 90 हजारांहून अधिक प्रेक्षक मैदानावर पोहोचू शकतील, असा अंदाज आयसीसीने व्यक्त केला आहे.

आयसीसीने या सामन्यासाठी आणखी 4000 तिकिटे जारी केली आहेत. ज्यांना उभे राहून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही तिकिटे आहेत. या तिकिटांची किंमत 30 ऑस्ट्रेलियन डॉलर (रु. 1670) आहे. आधी तिकिटांसाठी अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. जास्तीत जास्त लोक हा सामना पाहू शकतील, हा तिकीट देण्याचा उद्देश असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

आयसीसीच्या वेबसाइटवरून आणि T20 वर्ल्ड कपच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही तिकिटे खरेदी करू शकता. सामन्यापूर्वी स्टेडियमवर पोहोचल्यावर, फोनमधील जिक्ट दाखवून मूळ तिकीट देखील मिळवू शकतो. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तिकिटेही उपलब्ध आहेत. हा सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल. टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे.

आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत फायनलसारखा थरार पाहायला मिळतो. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. मात्र, या सामन्याच्या माध्यमातून प्रथमच पाकिस्तानच्या संघाला कोणत्याही आयसीसी विश्वचषकात भारताला पराभूत करण्यात यश आले. टीम इंडियाच्या नजरा गेल्या वर्षीच्या पराभवाचा बदला घेण्याकडे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT