Indian Team New Jersey sakal
क्रीडा

Indian Team New Jersey : T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच, पहा Photo

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने नवी जर्सी आज लाँच केली आहे.

Kiran Mahanavar

Indian Team New Jersey : ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात टी-20 वर्ल्ड कप खेळल्या जाणार आहे. यासाठी भारताने नवीन जर्सी लाँच केली आहे. जर्सीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या नवीन जर्सीत पोज देताना दिसत आहे. भारतीय संघाला T20 विश्वचषकात पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.

भारतीय संघाला पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने नवी जर्सी आज लाँच केली आहे. या संघाच्या नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. संघाची ही नवीन जर्सी निळ्या रंगाची आहे. या जर्सीमध्ये तीन स्टार आहेत. त्याचवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा या जर्सीत पोज देताना दिसत आहे. भारतीय संघ टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

भारतीय संघाच्या T20 विश्वचषक 2022 साठी लाँच करण्यात आलेल्या नवीन जर्सीमध्ये तीन तारे आहेत. थ्रीस्टार भारतीय संघाने तीन वेळा जगज्जेतेपद पटकावल्याची ही खूण आहे. भारतीय संघाने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली प्रथम विश्वचषक जिंकला होता. T20 विश्वचषकाच्या पहिल्या सत्रात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या दोन विश्वचषकांनंतर भारतीय संघाने 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ (India squads T20 World Cup 2022) -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर

T20 विश्वचषकासाठी भारताचे पूर्ण वेळापत्रक-

  • 17 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (सराव सामना)

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड (सराव सामना)

  • 23 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान

  • 27 ऑक्टोबर - भारत वि A2

  • 30 ऑक्टोबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध बांगलादेश

  • 6 नोव्हेंबर - भारत विरुद्ध B1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT