arshdeep singh sakal
क्रीडा

T20 World Cup : परिस्थितीनुसार खेळावे लागेल ; अर्शदीप सिंग

भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे मत

सकाळ वृत्तसेवा

तिरुवअनंतपुरम : ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या दरम्यान टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी ऑस्ट्रेलियातील परिस्थिती, वातावरण यांच्याशी समरूप व्हावे लागेल, असे स्पष्ट मत भारताचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने व्यक्त केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० लढतीत सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यानंतर पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

भारतीय संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयाबाबत अर्शदीप म्हणाला, सराव सत्रात आम्ही कसून अभ्यास केला. त्यानंतर आखलेल्या योजनांचा पहिल्या लढतीत अवलंब केला. या लढतीत पॉवर प्लेमधील गोलंदाजीही छान झाली. यापुढेही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही त्याने नमूद केले. मागील दहा दिवसांमध्ये अधिक सक्षम होऊन पुनरागमन केले आहे. याचा फायदा गोलंदाजीत होत आहे. मैदानात आणखी छान कामगिरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे, असे अर्शदीप आवर्जून सांगतो.

अर्शदीपने पहिल्या लढतीत डी कॉक, रायरी रोसो व डेव्हीड मिलर या दक्षिण आफ्रिकेच्या तीन प्रमुख फलंदाजांना बाद करीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या वेळी तो म्हणाला, चेंडू स्वींग होत होते. त्यामुळे चेंडू योग्य टप्प्यात टाकण्याचे ठरवले. सुरुवातीला विकेट मिळाल्याचा आनंद आहे. नवीन चेंडूने दीपक चहरसोबत चांगली गोलंदाजी करता आली, असे ही त्याने सांगितले.

आयपीएलचा शेवट होत असताना भारतीय संघ व्यवस्थापनाकडून मला सांगण्यात आले की, आगामी काळासाठी आम्ही तुझा विचार करीत आहोत. त्यानंतर जेव्हा संधी दिली जाते, तेव्हा आपला ठसा उमटवायचा हे मनापासून ठरवले. टीम इंडियामध्ये निवड होईल की नाही याबाबत जास्त विचार केला नाही.

-अर्शदीप सिंग, वेगवान गोलंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT