rohit sharma on dinesh karthik sakal
क्रीडा

Dinesh Karthik : रोहितच्या डोक्यात DK फिट! पंतचा चेहरा पडला

भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी आता....

Kiran Mahanavar

Dinesh Karthik IND vs AUS T20 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी आपली रणनीती काटेकोरपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. रोहितला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी अधिक वेळ द्यायचा आहे. भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी एकाची निवड करत आहे. आशिया कपमध्ये पंतची निवड झाली होती, पण पंतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांत वगळण्यात आले.

ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला, मला विश्वचषकापूर्वी या दोन खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्यायची आहेत. पण मला वाटते, दिनेश कार्तिकला आणखी वेळ देण्याची गरज आहे. या मालिकेत कार्तिकला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. कार्तिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 8 चेंडू खेळले, तर पंतने एक सामना खेळला. पण पंतला फलंदाजीची संधी मिळाली नाही. रोहित म्हणाला, पंतलाही वेळ हवा आहे, पण या मालिकेत फलंदाजीत सातत्य राखणे महत्त्वाचे होते. यावरून पंतचा चेहरा पडला.

भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे आणि रोहितने सांगितले की, कार्तिक आणि पंत यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणे परिस्थितीवर अवलंबून असेल. तो म्हणाला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय होईल हे मला माहीत नाही. आम्हाला फलंदाजीत लवचिकता हवी आहे. परिस्थितीनुसार डाव्या हाताच्या फलंदाजाला मैदानात उतरवायचे असेल तर आम्ही ते करू. उजव्या हाताच्या फलंदाजाची गरज भासल्यास त्याला मैदानात उतरवले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

SCROLL FOR NEXT