T20 World Cup sakal
क्रीडा

T20 World Cup : स्कॉटलंडच्या विजयाने इंग्लंडच्या अडचणी वाढल्या;ओमानवर सात विकेट राखून मात

स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाने टी-२० विश्‍वकरंडकाच्या साखळी फेरीतील लढतीत दुसरा विजय मिळवत ब गटामध्ये पाच गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली.

सकाळ वृत्तसेवा

नॉर्थ साऊंड : स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाने टी-२० विश्‍वकरंडकाच्या साखळी फेरीतील लढतीत दुसरा विजय मिळवत ब गटामध्ये पाच गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. स्कॉटलंडने रविवारी मध्यरात्री पार पडलेल्या लढतीत ओमान संघावर सात विकेट व ४१ चेंडू राखून मात केली.

ओमान संघाला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. नाबाद ६१ धावांची खेळी साकारणाऱ्या ब्रँडन मॅकम्युलेन याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. स्कॉटलंडच्या दोन विजयांनी आता गतविजेत्या इंग्लंडच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचा ‘सुपर आठ’ फेरीमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

ओमानकडून स्कॉटलंडसमोर १५१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. जॉर्ज मुंसे याने ४१ धावांची व ब्रँडन मॅकम्युलेन याने नाबाद ६१ धावांची खेळी साकारताना स्कॉटलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी ओमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली. सलामीवीर प्रतीक आठवले याने ४० चेंडूंमध्ये पाच चौकार व दोन षटकारांसह ५४ धावांची खेळी साकारली. अयान खान याने नाबाद ४१ धावा फटकावल्या. ओमान संघाने २० षटकांमध्ये सात बाद १५० धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक ­­: ओमान- २० षटकांत सात बाद १५० धावा (प्रतीक आठवले ५४, अयान खान नाबाद ४१, साफयान शरीफ २/४०) पराभूत वि. स्कॉटलंड- १३.१ षटकांत तीन बाद १५३ धावा (जॉर्ज मुंसे ४१, ब्रँडन मॅकम्युलेन नाबाद ६१, मॅथ्यू क्रॉस नाबाद १५, बिलाल खान १/१२).

ब गटामध्ये चुरस

स्कॉटलंडच्या दोन विजयांसह ब गटामध्ये ‘सुपर आठ’ फेरीमध्ये पोहोचण्यासाठी कमालीची चुरस लागली आहे. स्कॉटलंडचा संघ पाच गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ दोन विजय व चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

नामिबियाचा संघ एका विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच गतविजेता इंग्लंडचा संघ फक्त एका गुणासह चौथ्या स्थानावर आहे. ओमान संघाला अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही. इंग्लंडच्या संघाला पुढल्या फेरीत पोहोचण्यासाठी नामिबिया व ओमान या दोन्ही संघांवर मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागणार आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड या देशांच्या लढतींच्या निकालावरही त्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalamb News: दुष्काळग्रस्तांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये म्हणून आमदारांना दोरखंडाचा ‘पहारा’!

चिठ्ठी लिहून घेतल्यानंतर किटकनाशक प्यायला भाग पाडलं, इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

SCROLL FOR NEXT