IND-vs-PAK 
क्रीडा

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल गंभीरची भविष्यवाणी

विराज भागवत

भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानशी होणार आहे

T20 World Cup: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच टी २० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. २४ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर भारताचा ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी, ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानशी तर पुढील दोन सामने ५ आणि ८ नोव्हेंबरला होणार आहे. भारत-पाकिस्तान हा सामना प्रचंड चर्चिला जातो. या सामन्याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने एक भविष्यवाणी केली.

"भारत पाकिस्तान सामना असला की भारताप्रमाणेच पाकिस्तानमधूनही अपेक्षा असतात. सध्याच्या घडीला जर आपण दोन संघ पाहिले तर भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप जास्त तगडा आहे. टी २० क्रिकेट हा प्रकार खूपच विचित्र असतो. या प्रकारात कोणताही संघ कोणत्याही संघाला कधीही पराभूत करू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. कारण या खेळ एका खेळाडूच्या कामगिरीनेही बदलू शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर राशिद खानने एखादी चांगली स्पेल टाकली तर अफगाणिस्तानसारखा संघ बड्या संघाला पराभवाची धूळ चारू शकतो. त्यामुळे भारत-पाक सामना रंगतदार होईलच. पण मला असं वाटतं की पाकिस्तानवर या सामन्याचा दबाव अधिक असेल", असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले.

Team-India

"कोणता संघ वरचढ ठरेल ते टी२० क्रिकेटमध्ये सांगणं कठीण आहे. पण काही लोक म्हणत आहेत की पाकिस्तानने युएईमध्ये खूप क्रिकेट खेळलं आहे. असं असलं तरीही भारताला युएईतील टी२० वर्ल्डकपचा फायदा जास्त होईल. कारण भारतीय खेळाडू युएईमध्ये आधी महिनाभर IPL खेळणार आहेत. जेव्हा टी२० वर्ल्डकपच्या आधी तुम्ही त्याच मैदानांवर IPL सामने खेळता तेव्हा तुम्हाला वर्ल्डकपच्या तयारीसाठी खूपच चांगला वेळ मिळतो. उभय देशांमधील मालिका खेळून जेवढी तयारी होते त्यापेक्षा जास्त तयारी IPL मधील सामने खेळून होते. त्यामुळे भारतालाच याचा जास्त फायदा होईल", असं स्पष्ट मतही गंभीरने व्यक्त केले.

"IPL चा दर्जा हा कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या तोडीस तोड असतात. तुम्ही विचार करा की वर्ल्ड कपच्या आधी तुम्ही श्रीलंकेविरूद्ध मालिका खेळलात तर त्याचा उपयोग जास्त होईल की IPL खेळलात तर त्याचा उपयोग अधिक होईल. IPLमध्ये तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने तयारी करता येते. अशा परिस्थितीत पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा भारतीय संघाला युएईतील T20 World Cup चा जास्त फायदा होईल", असं गंभीरने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT