diya chitale sakal
क्रीडा

Table tennis : दिया चितळेची उपांत्य फेरीत धडक

महाराष्ट्राच्या दिया चितळे हिने टेबल टेनिसमध्ये महिलांच्या एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली

सकाळ वृत्तसेवा

सुरत : पदकाचे आशास्थान असलेल्या महाराष्ट्राच्या दिया चितळे हिने टेबल टेनिसमध्ये महिलांच्या एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र तिची सहकारी रीथ रीशा हिचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दिया हिला हरियानाच्या सुहाना सैनी हिच्याविरुद्ध विजय मिळवताना शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला. रोमहर्षक लढतीनंतर तिने हा सामना ११-५, ४-११, ११-७, ३-११, ११-५, ८-११, १२-१० असा जिंकला.

दोन्ही खेळाडूंनी आक्रमण व टॉप स्पीन फटक्यांचा सुरेख खेळ केला.‌ सांघिक विभागात महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या दियाने शेवटपर्यंत संयम ठेवीत विजयश्री खेचून आणली. आता दियासमोर उपांत्य फेरीत श्रीजा अकुला हिचे आव्हान असेल. तसेच मनीका बत्रा - सुतीर्था मुखर्जी यांच्या मध्ये अन्य उपांत्य लढत होणार आहे. पश्चिम बंगालच्या सांघिक विजेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या सुतीर्था मुखर्जी हिच्या चतुरस्र खेळापुढे रीथ रीशा हिच्या खेळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

मुखर्जी हिने हा सामना ११-९, १२-१०, ११-८, १०-१२, ११-९ असा जिंकला. चौथ्या गेममध्ये रीशा हिने चांगला खेळ केला. या गेममध्ये विजय मिळवत तिने सामन्यात उत्सुकता निर्माण केली, मात्र पाचव्या गेममध्ये तिला चिवट लढतीनंतर पराभव पत्करावा लागला. दीपित पाटील पराभूत पुरुषांच्या एकेरीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निराशा केली.‌ स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर गुजरातच्या हरमीत देसाई याने महाराष्ट्राच्या दीपित पाटील याचे आव्हान ११-३, ११-६, ११-२, ११-९ असे सहजगत्या संपुष्टात आणले.

महाराष्ट्राचा महत्त्वाचा खेळाडू सनिल शेट्टी यालाही पराभवास सामोरे जावे लागले. तेलंगणाच्या फिडेल रफीडेऊ याने त्याच्यावर १५-१३, ६-११, ९-११, १५-१३, ७-११, १२-१०, ११-९ असा विजय नोंदवला. महिलांच्या दुहेरीत सुतीर्था मुखर्जी हिने अखिया मुखर्जी हिच्या साथीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष व दिया चितळे यांना ३-१ (११-६, ६-११, ११-५, ११-६) असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या रीथ रीशा व श्रुती अमृते यांचेही आव्हान संपुष्टात आले. कर्नाटकच्या व्ही. खुशी व यशस्विनी घोरपडे या जोडीने रीश - श्रुती या जोडीला ११-४, ११-८, ११-७ असे निष्प्रभ केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

नव्या नवरीवर भारी पडला जाऊबाईंचा तोरा! अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तिची जाऊ; मेघनच्या वहिनीला पाहिलंत का?

Horoscope Prediction : उद्या तयार होतोय गजकेसरी राजयोग; मिथुन राशीबरोबर पाच राशींना लागणार जॅकपॉट !

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

SCROLL FOR NEXT