Tamil Star Nagarjuna gist BMW X5 SUV to P V Sindhu  
क्रीडा

तमिळ स्टार नागार्जुनने सिंधूला दिली 73 लाखाची BMW भेट

वृत्तसंस्था

हैदराबाद : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूने सुवर्ण पदक मिळवले आणि सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकविणारी ती पहिली महिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. अशात टॉलिबूडमधील स्टार नागार्जुनने तिला या यशाबद्दल बीएलडब्लूची खास कार भेट दिली आहे. 

नागार्जुनने तिला BMW X5 SUV भेट दिली आहे. हा कार्यक्रम हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्या पार पडला. ''अशा लोकांचा सन्मान करायला मिळणे हा आपलाच सन्माम आहे. ज्यांच्या कष्टांमुळे असे खेळाडू तयार होतात त्या गोपीचंद यांनाही माज्या शुभेच्छा. तसेच तिच्या आईवडिलांनाही देशाला एवढी उत्तम खेळाडूदिल्याबद्दल मला आभार द्यायचे आहेत,'' अशा शब्दांत त्याने सिंधूला शुभेच्छा दिल्या. 

यापूर्वीही ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक पटकाविल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही तिला याच कंपनीची कार भेट केली होती. 

या भेटीबद्दल बोलताना सिंधू म्हणाली, ''एव्हर ग्रीन सुपरस्टार नागार्जुन सर आणि गोपी सरांसोबत ही भेट स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT