FIFA World Cup 2022 Tanya Tate
FIFA World Cup 2022 Tanya Tate esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : पॉर्न स्टारने कतारमध्ये जाणाऱ्या इंग्लंडच्या फॅन्सना दिला सल्ला, म्हणाली...

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये संभाव्य विजेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या इंग्लंडने आपल्या पहिल्या सामन्यात इराणचा 6 - 2 असा पराभव करत धडाक्यात सुरूवात केली. त्यामुळे बार्मी आर्मीचा आनंद गगणात मावत नाहीये. मात्र याच इंग्लंडच्या उत्साही चाहत्यांना सुप्रसिद्ध ब्रिटिश पॉर्नस्टार आणि लिव्हरपूलची जबरा फॅन तान्या टेटने एक मोलाचा सल्ला दिला आहे. कडक नियम असलेल्या कतारमध्ये सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांना सेक्स टॉईज आपल्या घरी ठेवून कतारला जाण्याचा सल्ला दिला आहे.

तान्याने सोशल मीडियाशी बोलताना सांगितले की, 'फिफा वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून कतार हा एक विचित्र देश आहे. वर्ल्डकपमध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देताना चाहते एकमेकांच्या जवळ येतात. मी तेथील फॅन्ससाठी चिंतेत आहे. ज्यावेळी इंग्लंडचा संघ गोल मारेल त्यावेळी आनंदाने उड्या मारणारे आपल्या देशाचे चाहते एकमेकांना मिठी मारतील त्यावेळी काय होईल याचा विचार मला चिंतेत टाकत आहे. अशा चाहत्यांना तेथे अटक होईल?'

43 वर्षाची तान्या आता लॉस एंजलिसमध्ये राहते. ती पुढे म्हणाली की, 'आपल्या सगळ्या विचित्र गोष्टी घरात ठेवा. आपल्या हातावर आपले नियंत्रण ठेवा आणि वर्ल्डकपमध्ये शांत बसा. मी कतारमध्ये जाणाऱ्या लोकांना सक्त सुचना करत आहे की आपल्या सूटकेसमध्ये दारू, ड्रग्ज पॅक करू नहा. आपले सेक्स टॉईज आणि एक्स रेटेड गोष्टी कतारमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नाका.'

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT