Tasmania defeat South Australia to win
Tasmania defeat South Australia to win sakal
क्रीडा

VIDEO: शेवटच्या षटकात 5 खेळाडू तंबूत! रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 1 धावांनी पराभव

Kiran Mahanavar

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कधीही काहीही होऊ शकते. हे सिद्ध करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक गेल्या शनिवारी महिला राष्ट्रीय क्रिकेट लीगचा अंतिम सामना खेळला गेला. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया महिला संघ यांच्यात हा सामना झाला, जो शेवटच्या षटकात तस्मानियाने 1 धावाने जिंकला.

शेवटच्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या झोळीत विजय दिसत होता, परंतु शेवटच्या 6 चेंडूंच्या आत अशा घटना घडल्या ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक दक्षिण ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज होती. म्हणजे 6 चेंडूत 4 धावा आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाला असता.

पण इथे नशिबाने खेळ केला. तस्मानियाच्या कर्णधार एलिस व्हिलानीने शेवटच्या षटकासाठी सारा कोयटेकडे चेंडू दिला. त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर अ‍ॅनी ओ'नीलला बाद केले. येथून सामन्याला कलाटणी मिळाली. पुढच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने एक धाव काढली, पण त्यानंतर सलग 4 चेंडूत 4 विकेट पडल्या. यादरम्यान 2 खेळाडू धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले, एक एलबीडब्ल्यू आणि एक यष्टीमागे स्टंप झाला. एकूण 6 चेंडूत 5 विकेट पडल्या आणि तस्मानियाने 1 धावाने सामना जिंकला.

विशेष म्हणजे या सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सामन्याबद्दल सांगायचे तर दक्षिण ऑस्ट्रेलिया स्कॉर्पियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तस्मानियाने एलिस व्हिलानी (110) आणि नाओमी स्टॅलेनबर्ग (75) यांच्या खेळीच्या जोरावर 50 षटकांत 264 धावा केल्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाला 47 षटकात 243 धावा करायच्या होत्या, परंतु त्यांचा संघ 241 धावांवर सर्वबाद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT