Shailesh Shrikhande sakal
क्रीडा

Shailesh Shrikhande : ड्रीम इलेव्हन करंडकाच्या बक्षीस सोहळ्यात टाटा रुग्णालयाच्या संचालकांची भावना

दिलीप वेंगसरकर हे माझे हिरो आणि आदर्श आहेत, अशी भावना विख्यात कॅन्सर सर्जन आणि टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक शैलेश श्रीखंडे यांनी व्यक्त केली. निमित्त होते ड्रीम इलेव्हन करंडकाच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिलीप वेंगसरकर हे माझे हिरो आणि आदर्श आहेत, अशी भावना विख्यात कॅन्सर सर्जन आणि टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक शैलेश श्रीखंडे यांनी व्यक्त केली. निमित्त होते ड्रीम इलेव्हन करंडकाच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे. १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

ओव्हल मैदानातील ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर ड्रीम इलेव्हन कप या १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास येऊ शकाल का, असा प्रश्‍न वेंगसरकर यांनी मला फोन करून विचारला.

मी तात्काळ त्यांना ‘हो’ म्हणून सांगितले. मी देखील आय.ई.एस. शाळेसाठी लहान असताना शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळलो असल्याने आणि दिलीप वेंगसरकर या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर असल्याने मी येथे आलो. क्रिकेटमधील आपल्या कारकिर्दीनंतर या व्यक्तीने युवा क्रिकेटपटूंसाठी जे अप्रतिम कार्य केले आहे, त्याला खरोखरच तोड नाही.

त्यामुळेच दोन शस्त्रक्रियांमध्ये थोडा वेळ काढून मी आज येथे आलो आहे. क्रिकेट खेळायला मैदानात उतरल्यानंतर खेळपट्टी, वातावरण या साऱ्यांना दोष न देता प्रत्येक वेळी आपली सर्वोत्तम खेळी करायला हवी. कारण हीच गोष्ट आपल्या उर्वरित आयुष्यातदेखील उपयोगी ठरते. आम्ही आजदेखील प्रत्येक शस्त्रक्रिया करताना आपले सर्व ज्ञान पणाला लावतो तेव्हाच त्या यशस्वी होतात, असे श्रीखंडे यांनी सांगितले.

दिलीप वेंगसरकर यांनीदेखील यावेळी बोलताना आपल्या फलंदाजीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या हर्ष गायकर आणि आयुष शिंदे यांनी शेवटपर्यंत नाबाद राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जेव्हा एखाद्या फलंदाजांचा जम बसतो, त्यावेळी आपली विकेट फेकून परतण्यापेक्षा संघाला विजयी करून परतणे हेच महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत ड्रीम इलेव्हन वेंगसरकर क्रिकेट अकादमीने क्रिकेट मंत्रा अकादमी संघावर ८ विकेट राखून मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्यांना डॉ. श्रीखंडे आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT