Tata Open Maharashtra ATP Tennis sakal
क्रीडा

Tata Open Maharashtra ATP Tennis : रामकुमार-मिग्युएल जोडीचा दुहेरीत धडाका!

टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस : बोपण्णा-बॉटीच जोडीवर सनसनाटी विजय

- मुकुंद पोतदार

पुणे : भारताच्या रामकुमार रामनाथन याने टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेच्या एकेरीतील आशा संपुष्टात आल्यानंतर काही तासांत दुहेरीसाठी कोर्टवर उतरून जिगरबाज खेळ केला. मेक्सिकोच्या मिग्युएल अँजेल रेयेस-वरेला याच्या साथीत त्याने देशबांधव रोहन बोपण्णा व नेदरलँडसचा बॉटीच वॅन डी झँडशुल्प यांना हरवले.

दोन तास दोन मिनिटे चाललेली लढत रामकुमार-मिग्युएल यांनी ६-७ (५-७), ७-६ (७-४), ११-९ अशी जिंकली. रामकुमार याच्या विजयामुळे दुहेरीत भारताच्या आशा उंचावल्या आहेत. बोपण्णा-बॉटीच यांच्या आठ बिनतोड सर्व्हिसना रामकुमार-मिग्युएल यांनी सहा बिनतोड सर्व्हिसद्वारे प्रत्युत्तर दिले.

दुहेरीत पर्यायी जोडी म्हणून प्रवेश मिळालेल्या जीवन नेदून्चेझियन-श्रीराम बालाजी यांनी भारताच्याच पुरव राजा-दिवीज शरण यांच्या जोडीचा ६-४, ६-३ असा पराभव केला. पुरव-दिवीज जोडीला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला होता.

साकेत मायनेनी-युकी भांब्री यांच्या जोडीचे आव्हान संपुष्टात आले. तिसऱ्या मानांकित सॅडीयो डौम्बीया-फेबियन रिबौल या फ्रेंच जोडीचे त्यांच्यासमोर आव्हान होते. टायब्रेकमध्ये गेलेला पहिला सेट एका गुणाच्या मोबदल्यात जिंकल्यानंतर युकी-साकेत यांनी पकड गमावली. त्यामुळे त्यांचा ६-७ (१-७), ५-७, ७-१० असा पराभव झाला.

एकेरीत आशा संपुष्टात

एकेरीत भारताच्या आशा संपुष्टात आल्या. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या शशीकुमार मुकुंदला सेंटर कोर्टवर फ्लाव्हियो कोबोली याने ६-४, ७-५ असे पराभूत केले. एक तास ३८ मिनिटे चाललेल्या लढतीत कोबोलीने बेसलाईनवरून मुकुंदने केलेला प्रतिकार मोडून काढला.

रामकुमार पराभूत

पात्रता फेरीत झुंजार खेळ करून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवलेल्या रामकुमार रामनाथन याची आगेकूच खंडित झाली. स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझविरुद्ध तो पहिला सेट जिंकल्यानंतर ६-३, ५-७, ३-६ असा पराभूत झाला. निर्णायक सेटमध्ये ब्रेकपॉइंट गमावल्याचा फटका त्याला बसला. मार्टिनेझ जागतिक क्रमवारीत ६२ व्या क्रमांकावर आहे.

दोन तास २८ मिनिटे चाललेल्या लढतीत मार्टिनेझने हाफ व्हॉलीच्या जोरावर रामकुमारला जेरीस आणले. त्याचे पासिंग शॉटही प्रभावी होते. रामकुमारने अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली. पहिल्या क्रमांकाच्या कोर्टवरील लढतीच्या वेळी त्याला स्थानिक प्रेक्षकांनी जोरदार प्रोत्साहन दिले. एक मॅचपॉइंट वाचवूनही रामकुमारचा प्रतिकार अपुरा ठरला.

जवळपास दहा मिनिटे चाललेल्या पहिल्या गेममध्ये रामकुमारने पाच वेळा ड्यूस साधूनही सर्व्हिस गमावली. यानंतरही रामकुमारने पहिला सेट जिंकून आशा पल्लवित केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

SCROLL FOR NEXT