Jasprit Bumrah 
क्रीडा

India squad for Ireland T20: 'तो' आला अन् थेट कर्णधार झाला! आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

सकाळ ऑनलाईन टीम

India squad for Ireland T20 : जवळपास एक वर्षानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याचे भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन झालेले आहे.

अखिल भारतीय वरिष्ठ क्रिकेट निवड समितीकडून सोमवारी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बुमरा याची कर्णधारपदी निवड करण्यात आली असून महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

भारत - आयर्लंड यांच्यामध्ये १८, २० आणि २३ ऑगस्ट या दरम्यान तीन सामने होतील. या मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, शिवम दुबे, रवी बिश्नोई या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आवेश खान व प्रसिद्ध कृष्णा यांचीही निवड झाली आहे. कृष्णा अखेरचा सामना गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध खेळला.

संघ : जसप्रीत बुमरा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेशकुमार, आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT