team india t20 world cup team announcement 
क्रीडा

T20 World Cup: उलटी गिनती सुरू! काही दिवसांत जाहीर होणार भारतीय संघ! 'या' खेळाडूंचे स्थान निश्चित

भारतीय संघ सध्या आशिया चषक खेळत असून सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पण टीम इंडियाची खरी नजर यावेळी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर आहे.

Kiran Mahanavar

Team India T20 World Cup squad : भारतीय संघ सध्या आशिया चषक खेळत असून सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पण टीम इंडियाची खरी नजर यावेळी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघात कोणाला स्थान मिळते याकडे सर्वांच्या नजर आहे. आयसीसीने आधीच सांगितले होते की, सर्व क्रिकेट बोर्डांना 15 सप्टेंबरपर्यंत टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या नावाची घोषणा करावी. विश्वचषकाचे यजमान ऑस्ट्रेलियानेही या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे, त्यामुळे विश्वचषकात कोण स्थान मिळवू शकते हे पाहावे लागेल. भारतीय संघावर नजर टाकली तर बहुतांश खेळाडूंची निवड होणार हे नक्की, फक्त 2-3 खेळाडूंच्या बाबतीत चर्चा होऊ शकते.

भारताचा विश्वचषकसाठी हा संघ असेल का?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह*, हर्षल पटेल*, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग, दीपक हुड्डा. (* खेळाडू आत्ता जखमी आहे )

टीम इंडिया मध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे या 15 खेळाडूंचे स्थान निश्चित होईल असे नाही. श्रेयस अय्यर, आवेश खान, उमरान मलिक, दीपक चहर, रवी बिश्नोई, इशान किशन या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र, टी-20 विश्वचषकाच्या संघात कोणाला स्थान मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताचे सामने

  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर (मेलबर्न)

  • भारत विरुद्ध अ गट उपविजेता, 27 ऑक्टोबर (सिडनी)

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर (पर्थ)

  • भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर (अ‍ॅडलेड)

  • भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर (मेलबर्न)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने घट; कोल्हापुरात अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT