India vs Pakistan Asia Cup 2022 sakal
क्रीडा

Asia Cup: 'टीम इंडियाला शारजामध्ये खेळायला भीती वाटते?' PAK क्रिकेटरचं वादग्रस्त विधान

भारत जेव्हा जेव्हा पाकिस्तानला हरतो तेव्हा त्यांचे खेळाडू वादग्रस्त विधाने करायला लागतात.

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. आशिया कपमध्ये भारताने प्रथम कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा त्यानंतर हाँगकाँगचा पराभव केला. भारत जेव्हा जेव्हा पाकिस्तानला हरतो तेव्हा त्यांचे खेळाडू वादग्रस्त विधाने करायला लागतात. आता असेच एक विधान पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केले आहे. पाकिस्तानकडून 53 सामने खेळलेल्या सिकंदर बख्तने म्हटले आहे की, भारतीय संघ फक्त दुबईतच का खेळतो त्याला शारजाची भीती वाटते का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा सुपर-4 सामना दुबईत होत आहे. याआधी टीम इंडियाने दुबईतच पाकचा 5 विकेटने पराभव केला. त्याचवेळी भारत आणि हाँगकाँग यांच्यातील सामनाही दुबईतच खेळला गेला. जो कोणी आयोजक आहे, तो हे वेळापत्रक ठरवतो. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर याला कदाचित याची माहिती नसेल किंवा ते जाणून ते वादग्रस्त विधान करण्याचा विचार करत असतील. आशिया कप फायनलपूर्वी भारतीय संघ दुबईत सुपर-4 टप्प्यातील तिन्ही सामने खेळणार आहे.

भारतीय संघ शारजाह किंवा अबुधाबीमध्ये खेळायला घाबरतो का, असा सवाल माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी केला आहे. दिग्गज कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन आणि अतुल वासन हे देखील जिओ टीव्ही वाहिनीच्या टीव्ही शोचा भाग होते ज्यामध्ये सिकंदर बोलत होता. चर्चेदरम्यान सिकंदरने या शोमध्ये सहभागी असलेल्या या भारतीय दिग्गजांना विचारले, मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की भारत शारजाह किंवा अबू धाबीमध्ये का खेळू इच्छित नाही? भारतीय संघ फक्त दुबईत खेळतो. तुम्हाला शारजाहमध्ये खेळायला भीती वाटते का ? वेळापत्रकानुसार भारताची शारजाहमध्ये पाकिस्तानशी लढत होणार होती, पण तुम्ही ठिकाण बदलून दुबई केले. तुम्हाला शारजाहमध्ये खेळायला भीती वाटते का? हा प्रश्न आमच्या लोकांनी विचारला होता.

बख्तच्या या प्रश्नावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि अझरुद्दीन काहीही बोलले नाहीत. अतुल वासन गंमतीने म्हणाला, शारजाह भारतीय संघासाठी चांगले राहिले नाही. आता आमचे आयसीसीशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे आम्ही तिथे खेळत नाही. हे ऐकून कार्यक्रमात बसलेले बाकीचे लोकही हसू लागले. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आशिया कपची आयोजक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT