Team India sakal
क्रीडा

Team India : टीम इंडियाचा मिस्ट्री बॉलर आहे कुठे? टी-20 विश्वचषकापासून बाहेर

सर्व दौऱ्यांमध्ये युवा खेळाडूंना सातत्याने संधी दिली जात आहे. पण एक खेळाडू असा आहे ज्याला टी-20 विश्वचषकानंतर संधी मिळालेली नाही.

Kiran Mahanavar

Team India : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेगवेगळ्या संघांविरुद्धच्या मालिका खेळण्यात व्यस्त आहे. भारतीय संघाला यंदा आशिया कप आणि टी-20 विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळायच्या आहेत. टीम इंडियाला आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वे गेली आहे. या सर्व दौऱ्यांमध्ये युवा खेळाडूंना सातत्याने संधी दिली जात आहे. पण एक खेळाडू असा आहे ज्याला टी-20 विश्वचषकानंतर संधी मिळालेली नाही.

भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला दीर्घकाळ संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. टी-20 विश्वचषकापासून वरुण भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर वरुणला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. मात्र वरुण जास्त काळ संघात राहू शकला नाही. गतवर्षी झालेल्या T20 विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते, मात्र त्या स्पर्धेत टीम इंडियाच्या पराभवानंतर वरुण पुन्हा भारतीय संघात दिसला नाही.

वरुण चक्रवर्तीच्या रूपाने टीम इंडियाला एक मिस्ट्री बॉलर सापडला आहे. पण आता या खेळाडूला टीम इंडियात परतणेही अशक्य झाले आहे. आता युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोईसारख्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे वरुणला पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. वरुणला मिस्ट्री बॉलर मानले जाते कारण त्याच्याकडे वेगवेगळे चेंडू टाकण्याची प्रतिभा आहे. आगामी झिम्बाब्वे मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीलाही टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या अनेक मालिकांपासून संघातील युवा खेळाडूंवर अधिक भर दिला जात असताना वरुणकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT