virat  sakal
क्रीडा

आक्रमक फलंदाजीतून मार्ग निघत नाही : विराट

...आणि कोहलीने उत्तर देताना उर्मटपणा दाखवला

सुनंदन लेले

लंडन : लीडस् सामना मोठ्या फरकाने गमावल्यावर काहीसा स्वत:वरच नाराज झालेला कप्तान विराट कोहली (virat kohli) पत्रकारांशी बोलायला आला तेव्हा त्याचा मूड चांगला नव्हता. त्यातून काही प्रश्न जरा वेगळ्या प्रकारे विचारले गेल्याने कोहलीने उत्तर देताना उर्मटपणा दाखवला. काय म्हणाला विराट कोहली...

पुजाराबद्दल : चेतेश्वरच्या क्षमतेबद्दल उगाच चर्चा चालू होती. एका डावानंतर चर्चा हवेत विरून गेली आहे. लीडस् सामन्याच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने चांगली फलंदाजी केली. तो सकारात्मक आणि चांगल्या लयीत वाटला. मला वाटते पहिल्या दोन सामन्यांत आम्ही चांगला खेळ केला होता. तिसऱ्या सामन्यात फलंदाजांनी पहिल्या डावात घात केला. मान्य आहे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना थोडी मदत करत होते; पण इतक्या लवकर बाद होण्याइतकी विकेट खराब नव्हती.

गोलंदाजीबद्दल : इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपल्यापेक्षा खूपच चांगला मारा सातत्यपूर्ण केला; पण खराब कामगिरीकरिता आपल्या गोलंदाजांना दोष द्यायला नको. आपल्या गोलंदाजांचे सातत्य कमी पडते आहे. आम्ही पराभवाची एकत्रित जबाबदारी घ्यायला हवी.

सहावा फलंदाज घ्यावा का : पाच गोलंदाजांना घेऊन खेळणे मला आवडते. जर पहिली गोलंदाजी करावी लागली आणि खेळपट्टी उत्तम असली, तर तीन वेगवान गोलंदाजांना संघात घेऊन खेळणे कठीण होते. कारण लवकर फिरकी गोलंदाजाला मारा करायला आणावे लागते. त्यामुळे सहा फलंदाजांनी सामन्यात उतरण्याने समतोल येतो, असे वाटत नाही. पहिल्या पाच जणांनी जबाबदारीने खेळायला हवे. योग्य भागीदाऱ्या‍ करून एक पाया रचून द्यावा आणि मग नंतरच्या फलंदाजांनी त्यात भर टाकावी.

गोलंदाजांना विश्रांती मिळणार का : ज्या वेगाने क्रिकेट खेळले जात आहे, त्याचा विचार करता कोणीच वेगवान गोलंदाज सतत खेळू शकणार नाही. मला वाटते की ज्या गोलंदाजाला थकवा जाणवू लागला असेल, त्याला विश्रांती देऊन बदली गोलंदाजाला संधी द्यावी लागेल. पुढील सामन्यात तसे होणार आहे. कोणत्याही एका खेळाडूच्या खराब कामगिरीवर मला बोलायचे नाही. या सामन्यात आम्ही खराबच खेळलो.

गोलंदाजीतले सातत्य त्रास देत आहे : इंग्लिश गोलंदाजांनी आम्हाला सतत उजव्या यष्टीची दिशा ठेवून चांगल्या टप्प्यावर मारा केला आहे. ज्याचा सामना करून मोठी खेळी उभारणे कठीण आहे. इंग्लंडमध्ये खूप मोठी खेळी करायचा प्रयत्न जरूर करावा; पण मुख्य लक्ष छोट्या परिणाम साधणाऱ्या भागीदाऱ्या रचण्यावर द्यावे. जर तसे केले, तर ३०० -३५० चा धावफलकही योग्य परिणाम साधू शकतो. इथे मारझोड करणारी फलंदाजी करून मार्ग काढता येत नाही. खूप शिस्त आणि दीर्घ काळ संयम ठेवायची तयारी करावी लागते. जे पत्रकार आम्ही बॅकफूटवर जास्त का खेळलो नाही विचारत आहेत, त्यांनी समोरच्या गोलंदाजांनी ज्या टप्प्यावर मारा केला त्याला बॅकफूटवर खेळणे शक्य आहे का, याचा अभ्यास करावा.

कमी वेळेत चौथा सामना : मला वाटते, की एका विजयाने कोणताही संघ महान होत नाही; तसाच एका पराभवाने कोणताही संघ खराब होत नाही. आमच्याकरिता प्रत्येक सामना नवा असतो. लीडस् च्या पराभवाने आम्ही खचणार नाही. पराभवाने भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाभिमानाला ठेच लागली आहे आणि त्याचा परिणाम चांगलाच होईल. आम्ही योग्य सुधारणा करून पुढच्या सामन्यात चांगला खेळ करून दाखवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT