Team India Cheteshwar Pujara sakal
क्रीडा

WI vs IND : WTC पराभवानंतर पुजाराने घेतला मोठा निर्णय! वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर सोडणार टीम इंडियाची साथ

Kiran Mahanavar

Cheteshwar Pujara : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत होण्याची ही दुसरी वेळ होती.

या पराभवानंतर एक गोष्ट निश्चित आहे की आगामी काळात टीम इंडियामध्ये काही मोठे बदल होणार आहेत. विशेषत: संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीनंतर त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, यादरम्यान या खेळाडूने मोठा निर्णय घेतला.

चेतेश्वर पुजारा जाणार इंग्लंडला

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर लगेचच चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा काऊंटीकडून खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. पुजारा कौंटीमध्ये ससेक्सकडून खेळतो. पुजाराने WTC फायनलपूर्वी या मोसमात ससेक्ससाठी 6 सामने खेळले असून 8 डावात त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

काउंटीमध्ये अप्रतिम कामगिरी

पुजाराने एप्रिलमध्ये डरहमविरुद्ध शतक झळकावून त्याच्या काउंटी हंगामाची सुरुवात केली आणि त्यानंतर ग्लॉस्टरशायर आणि वूस्टरशायरविरुद्ध शतके झळकावली. त्याने खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये तो ससेक्सचा कर्णधार देखील होता, जिथे त्याने 68.12 च्या सरासरीने 545 धावा केल्या. गतवर्षीप्रमाणेच तो रॉयल लंडन चषक स्पर्धेतही भाग घेणार आहे.

अर्शदीप पण खेळतो कौंटी

सध्या काउंटी सर्किटमध्ये एकमेव भारतीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आहे, जो त्याच्या पहिल्या काऊंटी हंगामात केंटकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत एका सामन्यात 90 धावांत 2 बळी घेतले आहेत. या मोसमासाठी लीसेस्टरशायरने टीम इंडियाचा आणखी एक स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेला करारबद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सीजनबाबत प्रेक्षक झाले व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या रणधुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT