IND vs AUS Pitch Report esakal
क्रीडा

Nagpur Test Pitch : नागपूर खेळपट्टीवरून घरचा आहेर; खुद्द राहुल द्रविडनेच नाक मुरडले?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS Pitch Report : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधी पहिला कसोटी सामना उद्यापासून नागपूर येथे सुरू होत आहे. नागपूरची खेळपट्टी कशी असणार याबाबतची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. नागपूरची खेळपट्टी ही फिरकीला साथ देणारी असावी अशी मागणी अनेक माजी खेळाडूंना केली आहे. कांगारूंनीही नागपूरची खेळपट्टी फिरकीला साथ देणार असेल असा अंदाज वर्तवत आधीपासूनच खेळपट्टीबाबत नकारात्मक प्रचार सुरू केला आहे.

दरम्यान, भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविड देखील नागपूरच्या खेळपट्टीवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. राहुल द्रविड जामठा स्टेडियमच्या पिच क्युरेटरशी हातवारे करत बोलत असल्याचे दिसे. भारत नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून सराव करत आहे. आता राहुल द्रविडने खेळपट्टीत बदल करावे अशी मागणी केली आहे.

दैनिक जागरणमध्ये आलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविड खेळपट्टीबाबत नाराज आहे. भारतीय संघ गेल्या दोन दिवसापासून सेंट्रल विकेटवर सराव करत आहे. आता राहुल द्रविडला सामन्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाच खेळपट्टीत बदल हवा आहे.

त्यामुळे क्युरेटर आणि अधिकारी दिवसरात्र भारतीय संघाला हवी तशी खेळपट्टी तयार करण्यासाठी काम करत आहेत. आता भारतीय संघाच्या गरजेनुसार साईट स्क्रीनमध्ये देखील बदल करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी बॉर्डर - गावसकर ट्रॉफीसाठी पाच दिवस सामना होईल अशा खेळपट्ट्या तयार करण्यात येणार होत्या. मात्र आता भारताचे संघव्यवस्थापन खेळपट्ट्या या फिरकीला पोषक असाव्यात यासाठी आग्रही आहे. भारताला WTC फायनलचे तिकीट बुक करायचं आहे.

खेळपट्ट्यांचा विषय इतका का चर्चेत आहे?

- भारतीय संघ मायदेशातील फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टींचा फायदा उचलू इच्छितो.

- ऑस्ट्रेलियाने याबाबत आधीच आपली नाराजी व्यक्त केली आहे.

- स्टीव्ह स्मिथ आणि इयार हेली यांनी आधीच वक्तव्य केले आहेत.

- भारताने नागपूरची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी केली.

- लाल मातीची ही विकेट पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देईल.

- भारत त्यांच्याकडे असलेल्या चार फिरकीपटूंचा चांगला वापर करून WTC finals मध्ये जागा पक्की करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT