Video Sakal
क्रीडा

IND vs NZ : टीम इंडियाची आज टुंडे कबाबची जंगी पार्टी; हा खेळाडू करणार खर्च, Video

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : भारताने रविवारी न्यूझीलंडसोबत झालेल्या टी२० सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी केली. तर पुढच्या टी२० सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचे भारताचे ध्येय असेल. तर दुसरा सामना जिंकल्यानंतर आता भारतीय टीम उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे जंगी पार्टी करणार आहे.

हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताचा स्फोटक फलंदाज सुर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल एकमेकांची मुलाखत घेताना दिसून आले. यावेळी तू अजून टुंडे कबाबची पार्टी दिली नाही असं चहल कुलदीपला म्हणाला. त्यानंतर, "नक्कीच पार्टी होईल... टुंडे कबाबची पार्टी उद्याच होईल...कबाबची ऑर्डरही दिली आहे" असं कुलदीप म्हणतो.

दरम्यान, लखनौमध्ये खेळला गेलेला भारत-न्यूझीलंड सामना क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय राहिला. या सामन्यात टीम इंडियाने एक चेंडू बाकी असताना 6 विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम खेळताना न्यूझीलंड संघाला केवळ 99 धावा करता आल्या. मात्र, टीम इंडियाला 100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खूप संघर्ष करावा लागला आणि अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT