Team India equal world record for winning most consecutive T20I  Sakal
क्रीडा

लंकेचे वाजले बारा! टीम इंडियाची विश्वविक्रमाशी बरोबरी

सुशांत जाधव

भारतीय संघाने धर्मशालाच्या मैदानात श्रीलंकेचा धुव्वा उडवत मालिका 3-0 अशी खिशात घातली. या विजयासह रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नवा इतिहास रचला आहे. भारतीय संघाचा आतंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील हा सलग 12 विजय आहे. या विजयासह टीम इंडियाने अफगाणिस्तानच्या विश्व विक्रमाशी (World Record) बरोबरी केलीये. सलग 12 सामन्याचा विक्रम आधी अफगाणिस्तानच्या नावे होता. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात श्रीलंका संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघासमोर 147 धावांचे आव्हान ठेवले होते. श्रेयस अय्यरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने हे आव्हान सहज परतवून लावले. (Team India equal world record for winning most consecutive T20I matches whitewash SL 3-0 )

भारतीय संघाने मिळवलेले विजय

1. विरुद्ध अफगानिस्तान- विजय (कर्णधार विराट कोहली)

2. विरुद्ध स्कॉटलंड- विजय- ( कर्णधार विराट कोहली

3. विरुद्ध नामीबिया- विजय (कर्णधार विराट कोहली)

4. विरुद्ध न्यूझीलंड- विजय (कर्णधार-रोहित शर्मा)

5. विरुद्ध न्यूझीलंड- विजय (कर्णधार-रोहित शर्मा)

6. विरुद्ध न्यूझीलंड- विजय (कर्णधार-रोहित शर्मा)

7. विरुद्ध वेस्ट इंडीज- विजय (कर्णधार-रोहित शर्मा)

8. विरुद्ध वेस्ट इंडीज- विजय (कर्णधार-रोहित शर्मा)

9. विरुद्ध वेस्ट इंडीज- विजय (कर्णधार-रोहित शर्मा)

10. विरुद्ध श्रीलंका- विजय (कर्णधार-रोहित शर्मा)

11. विरुद्ध श्रीलंका- विजय (कर्णधार-रोहित शर्मा)

12 विरुद्ध श्रीलंका - विजय (कर्णधार-रोहित शर्मा)

रोहितच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या मालिकेत प्रतिस्पर्ध्याला क्लीन स्विप

भारतीय संघाचे पूर्णवेळ नेतृत्व मिळाल्यानंतरची रोहित शर्माची ही तिसरी टी-20 मालिका होती. आतापर्यंतच्या तिन्ही टी-20 मालिकेत भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्विप केले. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीची जागा रोहित शर्माने घेतली. घरच्या मैदानावर रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्ध सामन्यातून रोहितपर्वाला सुरुवात झाली. यावेळीही तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने बाजी मारली होती. वेस्ट इंडीजनंतर श्रीलंके विरुद्ध 3-0 असा विजय मिळवला.

• श्रीलंका- 3-0

• न्यूझीलंड- 3-0

• वेस्ट इंडीज- 3-0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT