Hardik Pandya 
क्रीडा

Team India : हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जाणार आयर्लंडला, एक नाही तर 5 सलामीवीरांना मिळणार संधी?

या मालिकेसाठी जय शाह आणि कंपनी उचलू शकते कठोर पावले

Kiran Mahanavar

Team India Hardik Pandya : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा पुढील वर्षी खेळल्या जाणार आहे. ही स्पर्धा युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर होणार आहे. यासाठी आयसीसीने आधीच घोषणा केली आहे. टी-20 विश्वचषकाची ही नववी स्पर्धा असणार आहे. सध्या त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

या स्पर्धेसाठी टीम इंडियाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. ऑगस्टमध्ये भारताला टी-20 मालिकेसाठी दोन देशांचा दौरा करायचा आहे. भारत 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर 18-23 ऑगस्ट दरम्यान आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

या मालिकेसाठी जय शाह आणि कंपनी काही कठोर पावले उचलू शकते आणि टीम इंडियाच्या संघातील वरिष्ठ खेळाडूंना वगळून यंगिस्तान संघाला संधी देऊ शकते. बीसीसीआय आयर्लंड दौऱ्यावर टी-20 मालिकेसाठी टीम इंडियासाठी सलामीवीरांची फौज पाठवू शकते. एक नव्हे तर सहा खेळाडूंना संघात संधी मिळू शकते. ही 5 नावे शुभमन गिल, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांची असू शकतात.

Ishan Kishan

आयर्लंड दौऱ्यावर ईशान पहिली पसंती सलामीवीर ठरू शकतो. टी-20 मध्ये भारतासाठी या फलंदाजाने 27 टी-20 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीने 653 धावा केल्या आहेत. त्याच वेळी आयपीएल 2023 मध्ये ईशानने 16 सामने खेळले आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 454 धावा केल्या.

Shubman Gill

आयर्लंड मालिकेत ईशान किशन शुभमन गिलचा जोडीदार बनू शकतो. हा खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने 17 सामन्यात 3 शतकांच्या मदतीने 890 धावा केल्या. त्याचबरोबर भारतासाठी या युवा फलंदाजाने 6 टी-20 सामन्यात 1 शतकाच्या जोरावर 202 धावा केल्या आहेत.

Yashasvi Jaiswal

यशस्वी जैस्वालला या दौऱ्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याने आयपीएल 2023 मध्ये झंझावाती फलंदाजीचा नमुना सादर केला आहे. या मोसमात त्याने 14 सामन्यात 1 शतकाच्या मदतीने 625 धावा केल्या आहेत.

Rituraj Gaikwad

ऋतुराज गायकवाड हा युवा फलंदाज आयर्लंड दौऱ्यावर जाऊ शकतो. या खेळाडूने भारतासाठी 9 टी-20 सामने खेळले असून त्यादरम्यान त्याने 135 धावा केल्या आहेत. त्याचवेळी आयपीएल 2023 मध्येही गायकवाडच्या बॅटचा जोरदार बोली आहे. त्याने 16 सामन्यांच्या 15 डावात 4 अर्धशतकांच्या मदतीने 590 धावा केल्या.

Sanju Samson

टीम इंडियाच्या संघात संजूलाही संधी दिली जाऊ शकते. हा खेळाडू सलामीवीर तसेच यष्टिरक्षक आहे. मागच्या वेळीही तो या दौऱ्यात टीम इंडियासोबत होता. भारतासाठी त्याने आतापर्यंत 17 टी-20 सामन्यांमध्ये 301 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, आयपीएल 2023 मध्ये या खेळाडूच्या बॅटचा जोरदार बोली होती. या मोसमात त्याने 14 सामन्यात 362 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT