team india esakal
क्रीडा

'दुखापतग्रस्त' टीम इंडिया निवडसमितीची डोकेदुखी वाढवणार?

आयपीएलनंतर टीम इंडिया महत्त्वाची सीरीज खेळणार आहे.

धनश्री ओतारी

आयपीएल 15 वा सीझन महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अशातच अनेक खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान आता आयपीएलनंतर टीम इंडिया महत्त्वाची सीरीज खेळणार आहे. मात्र, तत्पुर्वी, टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणारी माहिती समोर आली आहे. आयपीएलमधून 3 दिग्गज खेळाडू जायबंदी झाल्याने बाहेर पडले आहेत.

आयपीएलनंतर टीम इंडिया पुढच्या महिन्यात साऊथ अफ्रिकाविरुद्ध टी20 सीरीज खेळणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरदेखील जाणार आहे. त्यामुळे इंडियाच्या खेळाडूंनी फिट राहणे गरजेचे आहे. पण, अशा महत्त्वाच्या परिस्थितीत संघाचे काही विनर खेळाडू जखमी झाले आहेत.

रवींद्र जडेजा हा टीम इंडियाचा अष्टपैलूपैकी महत्त्वाचा एक खेळाडू आहे. जडेजासाठी यंदाचे आयपीएल सीझन खराब ठरलं. काही दिवसांपूर्वी तो जायबंदी झाला. त्यामुळे त्याला उर्वरीत सामन्याला मुकावे लागलं.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (RCB) क्षेत्ररक्षण करत होता. दरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापत झाली आणि त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशी घोषणा चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या ट्विटर हँडलवरून केली होती.

पण टीम इंडियासाठी जडेजाला लवकर फिट होणे गरजेचं आहे. आत्तापर्यंत जडेजाने केवळ 10 मॅच खेळल्या आहेत. त्याने 20 च्या सरासरीने केवळ 116 धावा केल्या आहेत. तर पाच विकेट काढल्या आहेत.

आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार अजिंक्य राहणेलाही दुखापत झाली आहे. तोदेखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी खूप महत्त्वाचा होता. या सामन्यात अखेर कोलकात्याच्या टीमने बाजी मारली. मात्र तरीही कोलकात्याचा ओपनर अजिंक्य रहाणेवर टीका करण्यात आल्या. हैदराबादविरूद्ध त्याला साजेसा खेळ करता आला नाही. दुखापत होऊनही अजिंक्य रहाणे एखाद्या लढवय्याप्रमाणे मैदानावर उभा होता.

अजिंक्यच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. यावेळी तो प्राथमिक उपचार घेऊन तो खेळत राहिला. पण, उमरान मलिकच्या ओव्हरमध्ये तो बाद झाला. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

खराब फॉर्ममुळे भारतीय टेस्ट संघातून बाहेर असणार रहाणे गेल्या काही दिवसांपासून टीमचा हिस्सा राहिलेला नाही. असे असले तरी तो अजुनही टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला संघात कधीही स्थान दिले जाऊ शकते. अशात तो जर दुखापतीतून कव्हर झाला नाही तर टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरु शकते.

मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी सुमार होत असताना फॉर्मात असलेला एकमेव फलंदाज सूर्यकुमार यादव मुंबईची साथ सोडली आहे. सूर्यकुमारच्या डाव्या हाताच्या मनगटाचा स्नायू दुखावला आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीला सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

तो केवळ आयपीएलमध्ये 8 मॅच खेळू शकला आहे. त्याची ही जखम टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार आहे. तो टीम इंडियाचा सर्वात मोठ मॅच विनर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT