Shubman Gill Net Worth esakal
क्रीडा

Shubman Gill Net Worth : आता कुठं सुरूवात झालेल्या शुभमनकडे वाढला जाहिरातींचा ओघ; कमाई ऐकून व्हाल अवाक

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Net Worth : भारत आणि न्यूझीलंड याच्यात झालेल्या वनडे आणि टी 20 मालिकेत भारताचा कोणता युवा खेळाडू चमकला असं विचारलं तर सर्वात आधी शुभमन गिलचेच नाव पुढे येते. इशान किशननंतर वनडेमध्ये शुभमन गिलने द्विशतक ठोकत आपण देखील लंबी रेस का घोडा असल्याचे दाखवून दिले.

मात्र वनडेत धमाका करणाऱ्या शुभमन गिलची टी 20 मालिकेत मात्र म्हणावी तशी सुरूवात झाली नव्हती. त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येत होते. संघातून बाहेर फेकला जाण्याची टांगती तलवार देखील त्याच्या डोक्यावर होती. मात्र अशा परिस्थितीत देखील शुभमन गिलने अर्धशतक नाही तर थेट शतकच ठोकले, तेही विक्रमासहीत! टी 20 क्रिकेटमध्ये गिलची 63 चेंडूत केलेली नाबाद 126 धावांची खेळी एका भारतीयकडून केलेली आतापर्यंतची सर्वोच्च खेळी ठरली.

चार्मिंग फेस असलेला गिल या शतकानंतर लगेचच सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. लोकांना त्याच्या खासगी आयुष्याबाबत त्याच्या रिलेशनशिपबद्दल जाणून घ्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली. गिलच्या डेटिंग आणि लिंकअपबाबत जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मात्र गिल कमावतो किती हे फारसे कोणाला ठाऊक नाही. आज आम्ही याबीबतचीच माहिती तुम्हाला देणार आहोत.

गिलची संपत्ती किती?

सोर्ट्सकीडाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघातील युवा सेंसेशन शुभमन गिलची निव्वळ संपत्ती ही जवळपास 31 कोटी आहे. त्याची कमाई मुख्यत्वे जाहिरात, बीसीसीआय करार, आयपीएल करार यांच्यातून होते. सध्या गिल हा नाईकी, जेबीएल, सीएट, सिंथॉल, विवो, जिलेट यासारख्या ब्रँड्सचे प्रमोशन करतोय. आता वनडे आणि टी 20 मधील शतकी खेळीनंतर त्यात वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. पंजाबच्या गिलकडे रेंज रोव्हर एसयूव्ही आणि महिंद्रा थार गाडी आहे.

बीसीसीआय गिलला किती देतं?

बीसीसीआयकडून गिलला एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख तर टी 20 साठी 3 लाख रूपये मिळतात. गिलने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत 13 कसोटी, 21 वनडे आणि 7 टी 20 सामने खेळले आहेत. याचा अर्थ त्याने चार वर्षात आंतरराष्ट्रीय मॅच फीमधून 3 कोटींची कमाई केली आहे.

गिलने आतापर्यंत 40 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. इथे तो प्रती सामना 2.4 लाख रूपये कमवतोय. तर बीसीसीआयच्या केंद्रीय करारानुसार त्याला वर्षाला 1 कोटी रूपये मिळतात.

आयपीएलमध्ये गिल किती छापतो?

आयपीएलमध्ये गिल गुजरात टायटन्सकडून खेळतोय. त्याला गुजरात टायटन्सने 8 कोटी रूपयाला खरेदी केलं आहे. पहिल्या हंगामात गुजरातने विजेतेपद पटकावले. गुजरातने 2023 च्या हंगामासाठी आहे त्या किंमतीला रिटेन केले आहे. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. तेथे त्याला प्रत्येक हंगामात 1.80 कोटी रूपये मिळत होते. तो केकेआरकडून चार हंगाम खेळला. या सर्वाची बेरीज केली तर आयपीएलमधून शुभमनने आतापर्यंत 23 कोटी रूपये छापले आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT