hardik pandya ireland series  
क्रीडा

Team India: वर्ल्डकप अन् आशिया कपमध्ये 'हा' खेळाडू बनणार टीम इंडियाचा उपकर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट?

Kiran Mahanavar

Team India New Vice Captain : आशिया कप 2023 अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही भारतीय संघाची अजून घोषणा करण्यात आली नाही. आता अशी माहिती येत आहे की, सोमवारी म्हणजेच 21 ऑगस्टला संघाची घोषणा केल्या जाणार आहे. यासोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) निवड समिती 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2023 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या सर्व संभाव्य खेळाडूंचीही घोषणा करणार आहे.

टीम इंडियाकडे एक दिग्गज खेळाडू आहे, जो आशिया कप आणि विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याचा पत्ता कट करून भारताचा उपकर्णधार बनू शकतो. वेस्ट इंडिज दौऱ्यावर हार्दिक पांड्याचे कर्णधारपद भारताने कॅरेबियन संघाविरुद्ध टी-20 मालिका 2-3 ने गमावल्यानंतर असे बोलले जात आहे.

यानंतर आयर्लंड दौऱ्यावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान हाती घेतली. जसप्रीत बुमराहने आपल्या शानदार कर्णधाराच्या जोरावर टीम इंडियाला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला.

अशा परिस्थितीत, जसप्रीत बुमराह 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक आणि आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार होण्यासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआय सांगितले की, 'नेतृत्वाच्या बाबतीत अनुभव पाहिल्यास जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्याच्या पुढे आहे. त्याने 2022 मध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय दौऱ्यात पांड्यापूर्वी तो वनडे संघाचा उपकर्णधारही होता.

पुढे तो म्हणाला की, 'जर बुमराहला आशिया कप आणि विश्वचषक या दोन्ही सामन्यांसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये उपकर्णधार बनवताना दिसले तर आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळेच ऋतुराज गायकवाड यांच्याऐवजी आयर्लंडमध्ये कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT