Team India esakal
क्रीडा

Team Indian : गोंधळात गोंधळ! कॅप्टनपासून विकेटकीपरपर्यंतची शोधाशोध; वर्ल्डकप जिंकायचा तरी कसा?

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा खराब फॉर्म पाहायाला मिळत आहे. अनेक दिवसांपासून टीम इंडियामध्ये सतत बदल घडताना दिसतात. कधी कॅप्टन, कधी ओपनर तर कधी विकेटकीपर यासर्वांमध्ये टीम इंडिया गोंधळलेली दिसत आहे. अशातच वर्ल्डकपला केवळ १० महिने उरले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर टीम इडियाचं कसं होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. (Team India ODI World Cup confusion opening wicket keeping captaincy Rohit Sharma Hardik Pandya Virat kohli Shikhar Dhawan)

टी 20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव झाला. भारताने शेवटची वेळ 2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी भारताचे प्रतिनिधत्व महेंद्रसिंग धोनी करत होता. टी 20 विश्वचषक संपत आला असताना आता एकदिवसीय विश्वचषकाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. अशातच टीम इंडियाच्या खराब खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav : 'टी-20 चा हीरो वनडेत झिरो'

एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडिया एकदिवसीय सामने खेळणार आहे, परंतु प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली असे अनेक प्रयोग केले जात आहेत की, टीम इंडियाचा कोअर ग्रुप कोणता असेल हे अद्याप ठरलेले नाही. कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, संघाचा उपकर्णधार केएल राहुल यांसारखे वरिष्ठ खेळाडू वारंवार ब्रेक घेत आहेत. अशा परिस्थितीत फॉर्ममध्ये सातत्य कसे राहणार? असा सवाल क्रिकेट जगतात उपस्थित होत आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार होता. न्यूझीलंडविरुद्ध टी 20 सीरीमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळली. आणि वनडे सीरीजमध्ये शिखर धवनच्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली. आता बांगलादेशचा दौरा झाल्यास रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपद मिळेल.

ओपनरमध्ये गोंधळ

केएल राहुल एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मासोबत की शिखर धवनसोबत सलामीला मैदानात उतरणार हे अद्याप ठरलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून हे खेळाडू एकत्र खेळलेले नाहीत. ही चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या काही एकदिवसीय मालिकेत फक्त शिखर धवन भारताचा कर्णधार होता. आणि रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. अशा परिस्थितीत रोहित-राहुल-धवनमधून सलामीची जोडी किंवा टॉप-3 निवडणे ही मोठी समस्या बनली आहे.

यष्टिरक्षकाचीही चिंता वाढली

केवळ सलामीच्या जोडीचीच नाही तर यष्टिरक्षकाचीही चिंता वाढली आहे. वनडे अन् टी 20 क्रिकेटमध्ये ऋषभ पंतचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे, तो सातत्याने अपयशी ठरत आहे. संजू सॅमसन, ईशान किशन किंवा अन्य कोणत्याही खेळाडूंना संधी दिली जात नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. पंत कसोटी क्रिकेटमध्ये सामना विजेता ठरला आहे, परंतु त्याला अद्याप एकदिवसीय किंवा टी-20 मध्ये स्वतःला सिद्ध करता आलेले नाही.

10 महिन्यांत विश्वचषक कसा जिंकणार?

एकदिवसीय विश्वचषक 2023 ला फक्त काही महिने शिल्लक आहेत, विश्वचषक भारतात फक्त ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. सप्टेंबरपर्यंत संघाची घोषणा केली जाईल, परंतु सध्या टीम इंडियाकडे 15 खेळाडूंची निश्चित बांधणी नाही.

यामुळेच टीम इंडियाला आता आपले १५ खेळाडू ठरवावे लागतील, जेणेकरून ती तयारी सुरू ठेवू शकेल. अन्यथा पुन्हा एकदा टी 20 विश्वचषक 2021, टी 20 विश्वचषक 2022 सारख्या चुकांची पुनरावृत्ती करून टीम इंडियावर वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावण्याचे दडपण असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT