ICC World Cup 2023  
क्रीडा

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपमधील भारताचे शेड्युल झाले अपडेट; टीम इंडिया 'या' तारखेला...

Kiran Mahanavar

ICC World Cup 2023 : भारतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्व 10 संघांची नावे समोर आली आहेत. नेदरलँड आणि श्रीलंका विश्वचषकासाठी पात्र (CWC Qualifiers) ठरले आहेत. या मेगा टूर्नामेंटसाठी पात्र ठरणारा नेदरलँड हा 10 वा संघ ठरला आहे. यापूर्वी श्रीलंका झिम्बाब्वेला हरवून पात्र ठरला होता.

2023 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणारा नेदरलँड हा 10 वा संघ

नेदरलँड्सच्या विजयासह 2023 च्या विश्वचषकातील 10 संघांची यादी आता पूर्ण झाली आहे. 2023 विश्वचषकासाठी पात्र ठरलेले नेदरलँड हे एकमेव सहयोगी राष्ट्र आहे. पहिले 8 संघ थेट विश्वचषकासाठी पात्र ठरले, त्यानंतर दोन संघ निवडण्यासाठी पात्रता फेरी खेळली गेली.

11 नोव्हेंबरला भारताविरुद्ध नेदरलँडचा सामना

5 सहयोगी संघ आणि 5 प्रमुख संघांनी विश्वचषक पात्रता फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेने प्रथम विश्वचषकासाठी पात्रता फेरीत प्रवेश केला, त्यानंतर नेदरलँड्सने स्कॉटलंडविरुद्ध विजय नोंदवून प्रवेश केला. नेदरलँड संघाला 11 नोव्हेंबर रोजी भारताकडून शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. या संघाबाबत टीम इंडियाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

दोन वेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर

दोन वेळा विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिज इतिहासात प्रथमच विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. जागतिक स्तरावर निराशाजनक कामगिरीसाठी संघाला जगभरातील चाहत्यांकडून आणि क्रिकेटपटूंकडून जोरदार टीकेचा सामना करावा लागला.

ODI वर्ल्ड कप 2023 मध्ये सहभागी संघांची अंतिम यादी :

  • भारत

  • ऑस्ट्रेलिया

  • इंग्लंड

  • न्युझीलँड

  • दक्षिण आफ्रिका

  • पाकिस्तान

  • बांगलादेश

  • अफगाणिस्तान

  • श्रीलंका

  • नेदरलँड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT