Rahul Dravid Virat Kohli esakal
क्रीडा

द्रविड सरांची 'किक' आणि विराटच्या चेहऱ्यावर उमटले हास्य Video

अनिरुद्ध संकपाळ

जोहान्सबर्ग : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे बीसीसीआय (BCCI) आणि विराटमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यामुळे भारतीय क्रिकेट जगत गेल्या दोन दिवसांपासून ढवळून निघत आहे. अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रीडा समिक्षकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) रवाना झाला. दरम्यान, संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी संघातील ताणावाचे वातावरण पहिल्याच सराव सत्रात दूर केले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बायो बबलमध्ये असलेल्या टीम इंडियाने बाहेरचे वाद बाहेरच ठेल्याचे पहिल्याच सराव सत्रात दिसून आले. संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संपूर्ण संघ सराव सत्रादरम्यान, फूटव्हॉली (Footvolley) खेळत असल्याचे दिसले. याबाबतचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.

या व्हिडिओला बीसीसीआयने 'जोहान्सबर्गमधील पहिल्या सराव सत्रादरम्यान टीम इंडियाने (Team India) अशा प्रकारे आपली बॅटरी चार्च केली. ऑन युअर मार्क्स, गेट सेट आणि फूटव्हॉली #SAvIND' अशे कॅप्शन दिले.

गेल्या दोन आठवड्यापासून कर्णधारपदावरून जो काही वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर टीम इंडियातील वातावरण हलके करण्यासाठी अशा मजेदार ट्रेनिंग सेशनचा चांगला फायदा होतो. प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी याचाच वापर करत संघातील वातावरण हलके ठेवण्याचा प्रयत्न केला.

भारतीय संघ सध्या विलगीकरणात आहे. त्यांनतर टीम इंडिया आता सरावाला सुरुवात करत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिला कसोटी सामना बॉक्सिंग डेला (Boxing Day) म्हणजे 26 डिसेंबरला सेंच्युरियन पार्कवर सुरु होणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी जोहान्सबर्ग येथे 3 जानेवारीपासून सुरु होईल. तर तिसरी कसोटी 11 जानेवारीला केप टाऊनला खेळवण्यात येणार आहे. यानंतर 19, 21 आणि 23 जानेवारीला तीन एकदिवसीय सामन्याची एकदिवसीय मालिका होणार आहे. भारतीय संघ ही एकदिवसीय मालिका रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT