Rohit Sharma ICC ODI World Cup 2023 Esakal
क्रीडा

Team India : संघाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार? आफ्रिकेविरुद्ध विजयानंतर कर्णधार रोहित स्पष्टच बोला

टीम इंडिया : आफ्रिकेविरुद्ध विजयानंतर कर्णधार रोहित स्पष्टच बोला

Kiran Mahanavar

Rohit Sharma ICC ODI World Cup 2023 :

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करत आहे. एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत.

टीम इंडियाच्या गोलंदाजी आणि फलंदाजीकडून या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी पाहिला मिळत आहे. भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र ठरला आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा एक सामना बाकी आहे. जो 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहे.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आगामी सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनवर मोठे वक्तव्य केले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. मोहम्मद शमी ज्या प्रकारे परतला आहे. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. रवींद्र जडेजा आमच्यासाठी एक अप्रतिम खेळाडू आहे. जो वर्षानुवर्षे प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळत आहे. आज जडेजाने डेथ ओव्हर्समध्ये येऊन महत्त्वपूर्ण धावा केल्या. नंतर विकेट्स घेतल्या. त्याला त्याची भूमिका माहीत आहे आणि संघाला त्याच्याकडून काय हवे आहे हे त्याला माहीत आहे.

यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, आता काही मोठे सामने येत आहेत. त्यात संघात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे येत्या सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणारे खेळाडूंनाच पुढील सामन्यात संधी मिळू शकते.

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे एकदिवसीय वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. यानंतर सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये चार सामन्यांत आतापर्यंत 16 विकेट घेतल्या आहेत.

भारतीय संघाने शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चे विजेतेपद महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. त्यानंतर भारतीय संघाने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. एकदिवसीय वर्ल्ड कप 2015 आणि 2019 च्या उपांत्य फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून विजेतेपद पटकावण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT