Team India sakal
क्रीडा

Team India : स्टार खेळाडूंचे वाढते वय BCCI अन् टीम इंडियासाठी डोकेदुखी! कोण असणार पुढचा कर्णधार?

Kiran Mahanavar

Team India : भारतीय क्रिकेट संघ सध्या महिनाभर विश्रांतीवर आहे. एप्रिल आणि मे महिन्यात खेळाडूंनी आयपीएल यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळला. ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला.

आता भारतीय संघाला सप्टेंबरमध्ये आशिया कप खेळायचा आहे. त्यानंतर घरी मैदानावर एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. या सर्वांच्या तयारीत संघ गुंतला आहे. भारतीय संघ ही मोठी स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर प्रशिक्षकपदाची कमान राहुल द्रविडकडेच राहणार आहे.

पण इथे पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे विश्वचषकानंतर बीसीसीआयला टीम इंडियासाठी नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. विशेषत: कसोटी संघासाठी तो निश्चितच शोधावा लागेल. याचे कारण म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या स्टार खेळाडूंचे वाढते वय.

कसोटी संघात समाविष्ट असलेल्या स्टार खेळाडूंचे सध्याचे वय

  • रोहित शर्मा - 36 वर्ष

  • विराट कोहली - 34 वर्षे

  • चेतेश्वर पुजारा - 35 वर्षे

  • अजिंक्य रहाणे - 35 वर्षे

  • रविचंद्रन अश्विन - 36 वर्षे

रोहित शर्मानंतर केएल राहुल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हे कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या दावेदारांमध्ये आघाडीवर आहेत. मात्र राहुलच्या सततच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. दुसरीकडे, पंत यांचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला होता. त्यातून तो सावरत आहे.

राहुल आणि पंत यांच्यानंतर श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हेदेखील कसोटी कर्णधारपदाचे मोठे दावेदार आहेत. पण इथेही अय्यर आणि बुमराहच्या दुखापतीची समस्या आहे. हे दोघेही सततच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. अय्यर आणि बुमराह यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, त्यानंतर ते अद्याप परत येऊ शकले नाहीत.

अशा परिस्थितीत एक नाव अगदी स्पष्ट होत आहे, ते म्हणजे शुभमन गिल. त्याने आपल्या फलंदाजीने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला असून दिग्गजांचेही कौतुक केले आहे. गिलने वनडेत द्विशतकही झळकावले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्येही गिलने आपल्या बॅटने धुमाकूळ घातला. अशा स्थितीत गिलही आपला दावा ठामपणे मांडू शकतात.

गिलला कर्णधार बनवून बीसीसीआयला आणखी एक मोठा फायदा मिळू शकतो. म्हणजेच गिल तिन्ही फॉरमॅट खेळण्यास सक्षम आहे. जितक्या हुशारीने तो कसोटीत धावा करतो, तितक्याच हुशारीने तो एकदिवसीय आणि टी-20 मध्येही खेळतो. अशा स्थितीत गिल हा तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा दावेदारही ठरू शकतो. मात्र, सध्या अष्टपैलू हार्दिक पांड्या हा वनडे आणि टी-20 साठी बीसीसीआयची पहिली पसंती आहे.

कसोटी संघाच्या कर्णधारपदाचे दावेदार आणि त्यांचे सध्याचे वय

  • केएल राहुल - ३१ वर्षे

  • ऋषभ पंत - 25 वर्षे

  • शुभमन गिल - 23 वर्षे

  • जसप्रीत बुमराह - 29 वर्षे

  • श्रेयस अय्यर - 28 वर्षे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT