Team India Sponsors Byju's and MPL Sports  ESAKAL
क्रीडा

Byju's Quit : स्पॉन्सर सोडतायत BCCI ची साथ; Oppo झालं आता Byju's अन् MPL चा देखील काढता पाय?

अनिरुद्ध संकपाळ

Team India Sponsors Byju's and MPL Sports : बीसीसीआयचे एकूण मुल्यांकन नुकतेच 91,000 कोटींच्या घरात पोहचले आहे. आयपीएल देखील जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लीग झाली आहे. मात्र याच बीसीसीआयच्या स्पॉन्सर्सनी आपला करार अर्धवट सोडून काढता पाय घेण्याचा सपाटाच लावला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजकांमधील दोन प्रायोजक बायजू (Byju's) आणि एमपीएल स्पोर्ट्स (MPL) यांना बीसीसीआयच्या करारामधून बाहेर पडायचे आहे.

जून महिन्यात बायजूने बीसीसीआयसोबचा टीम इंडियाच्या स्पॉन्सरशीपचा करार नोव्हेंबर 2023 पर्यंत वाढवला होता. यासाठी त्यांनी जवळपास 289 कोटी रूपये मोजले होते. आता बायजू कंपनीला बीसीसीआयसोबतचा करार मोडायचा आहे. बीसीसीआयने बायजूला त्यांचा करार मार्च 2023 पर्यंत कायम ठेवण्यास सांगितले आहे.

बीसीसीआय याबाबत म्हणते की, 'बायजूकडून बीसीसीआयला 4 नोव्हेंबर 2022 ला मेल मिळाला आहे. त्यात त्यांनी टी 20 वर्ल्डकप झाल्यानंतर बीसीसीआयसोबतचा करार संपवण्याची विनंती केली होती. आमची याबाबत बायजू सोबत चर्चा झाली आहे आणि आम्ही त्यांना सध्याचा करार हा 31 मार्च 2023 पर्यंत कायम ठेवावा असे सांगितले आहे.' याबाबत बुधवारी झालेल्या बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत देखील चर्चा करण्यात आली आहे.

बायजूने 2019 मध्ये ओपोला रिप्लेस करत टीम इंडियाचे प्रायोजकपद आपल्याकडे घेतले होते. याचबरोबर बायजू फिफा वर्ल्डकप 2022 चे देखील प्रायोजक होते. एज्यूटेक कंपनी बायजूने नुकतेच आर्थिक तोट्यामुळे आपल्या 50 हजार कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बायजू पाठोपाठ भारतीय संघाचे किट प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्स देखील आपला करार केकेसीएल कंपनीकडे हस्तांतरित करायचा आहे. त्यांचा करार हा 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये नायके ला रिप्लेस केले होते. दरम्यान, बीसीसीआयने एमपीएल स्पोर्ट्सला देखील आपला करार 31 मार्च 2023 पर्यंत कायम ठेवण्यास सांगितला आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT