India squad ODI World Cup 2023
India squad ODI World Cup 2023 esakal
क्रीडा

ODI World Cup 2023 : राहुल, सॅमसनबाबत होणार मोठा निर्णय, वर्ल्डकप संघाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला!

अनिरुद्ध संकपाळ

India squad ODI World Cup 2023 : भारतीय संघातील सावळा गोंधळ अखेर संपुष्टात येणार आहे. भारताचा 2023 च्या वनडे वर्ल्डकपसाठीचा संघ लवकरच घोषित होणार आहे. भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आशिया कप खेळत असून या संघातील बहुतांश खेळाडू हे वर्ल्डकपच्या संघात असतील. मात्र वर्ल्डकपच्या संघनिवडीवेळी केएल राहुल आणि संजू सॅमसनबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.

भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप 2023 ची सुरूवात होणार आहे. वर्ल्डकपची सुरूवात होण्याला अवघे काही आठवडे राहिले असतानाही बीसीसीआयने अजून भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. मात्र आता बीसीसीआयने संघाची घोषणा करण्यासाठी मुहूर्त सापडला असून पुढच्या आठवड्यात संघाची घोषणा होऊ शकते.

आयसीसीने वनडे वर्ल्डकप 2023 साठी सर्व सहभागी देशांना आपला संघ 5 सप्टेंबरपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडसमितीने आशिाय कपसाठी 17 खेळाडूंचा संघ निवडला आहे. मात्र भारताला आता 15 खेळाडूंचा संघ निवडणे गरजेचे आहे. त्यामुळे तिलक वर्मा आणि एक वेगवान गोलंदाज कमी होऊ शकतो.

निवडसमितीला शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यातील एकाची निवड करावी लागणार आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये डेप्थ कमी आहे. अशावेळी शार्दुल ठाकूरची फलंदाजी उपयुक्त ठरू शकते. मधल्या षटकांमध्ये एक आक्रमक प्रवृत्तीचा खेळाडूची देखील गरज लागणार आहे.

याचबरोबर जर केएल राहुल दुखापतीतून सावरू शकला नाही तर संजू सॅमसन हा त्याची भारतीय संघातील रिप्लेसमेंट असू शकतो. जर केएल राहुलने फिटनेस टेस्ट पास केली तर संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा हे संघासोबत स्टँड बाय खेळाडू म्हणून प्रवास करतील.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT