team India Squad For T20 World Cup 2022
team India Squad For T20 World Cup 2022  sakal
क्रीडा

T-20 World Cup साठी भारतीय संघ जाहीर, पण ओपनिंग-बॉलिंग कॉम्बिनेशनच काय?

Kiran Mahanavar

India Squad For T20 World Cup 2022 Announced : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 2007 मध्येच भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारत अजूनही विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. टीम इंडियाची घोषणा झाली आहे. पण अजूनही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळणे बाकी आहे. अशा प्रश्नांची उत्तरे वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी भारताला शोधावी लागतील, जेणेकरून मिशन वर्ल्डकपमध्ये कोणताही अडथळा आणि भारताचे स्वप्न भंग होऊ नये.

कोण करणार ओपनिंग ?

ओपनिंग कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत फक्त केएल राहुल आणि रोहित शर्मा टीम इंडियासाठी टी-20 मध्ये ओपनिंग करत होते. त्यानंतर केएल राहुलऐवजी विराट कोहलीला ओपनिंग करण्याची मागणी करण्यात आली होती. विराटने आयपीएलमध्ये यशस्वी ओपनिंग केली आहे. आशिया चषकमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहली ओपनिंगला आला होता. तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिले शतक केले. विराट कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय शतकातील 71वे शतक होते. अशा परिस्थितीत आता ऑस्ट्रेलियातील कोहली-रोहित की राहुल-रोहित जोडीवर संघ व्यवस्थापन विश्‍वास ठेवते हे पाहायला मिळणार आहे.

कार्तिक का पंत?

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांचा समावेश करण्यात आला होता, मात्र दिनेश कार्तिक फक्त एकच सामना खेळला तर ऋषभ पंतला मिळालेल्या संधी अपयशी ठरल्या. आयपीएल 2022 नंतर दिनेश कार्तिकने फिनिशरच्या भूमिकेत ज्या प्रकारे चांगली कामगिरी केली आहे, त्यानंतर त्याचे प्लेइंग-11 मधील स्थान निश्चित झाले आहे. पण संघ व्यवस्थापन अजूनही ऋषभ आणि कार्तिकच्या निवडीबाबत चिंताग्रस्त आहे. ऑस्ट्रेलियात ही चूक भारी पडू शकते.

गोलंदाज कोण-कोण खेळणार?

टीम इंडियात जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे त्यांचे टी-20 संघात खेळणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे प्लेइंग-11 मधला तिसरा वेगवान गोलंदाज कोणाता खेळणार हा प्रश्न आहे. टीम इंडियाची ताकद फिरकी आहे, त्यामुळे तीन वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटू कोण असणार आहे हा पण मोठा प्रश्न आहे.

भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT