team india t20 world cup team announcement sakal
क्रीडा

T20 World Cup : दुखापती टीम इंडिया जिंकणार का वर्ल्ड कप? 'या' खेळाडूंनी वाढवले टेन्शन

BCCI 15 सप्टेंबरला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते, पण त्याआधी चिंतेची बाब म्हणजे गोलंदाजांची दुखापत आहे.

Kiran Mahanavar

भारतीय संघाचा आशिया कप 2022 मधील प्रवास संपुष्टात आला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव केला. पाकिस्तानच्या विजयामुळे भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आशिया चषकात निराशाजनक खेळ दाखवल्यानंतर आता भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य टी-20 विश्वचषकातील कामगिरीवर असेल. BCCI 15 सप्टेंबरला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते, पण त्याआधी चिंतेची बाब म्हणजे गोलंदाजांची दुखापत आहे.

भारताची पाच प्रमुख गोलंदाज फिटनेस/दुखापतीच्या समस्यांनी त्रस्त आहेत. अशा स्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जोरावर टीम इंडिया विश्वचषक कसा जिंकणार असा प्रश्न नक्कीच पडतो.

Jasprit Bumrah

जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. या दुखापतीमुळे त्याला आशिया कपमधूनही बाहेर व्हावे लागले. बुमराह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे. बुमराह टी-20 विश्वचषकासाठी तंदुरुस्त होईल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

Harshal Patel

बरगडीच्या दुखापतीमुळे हर्षल पटेलला आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. हर्षल पटेल या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान तो मैदानात परतण्याची अपेक्षा आहे. हर्षल पटेल हा स्लो बॉलसह यॉर्कर टाकण्यात माहिर आहे.

Ravindra Jadeja

स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, आता त्याचे यशस्वी ऑपरेशन झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर रवींद्र जडेजाला 2022 च्या टी-20 विश्वचषकात खेळणार का नाही हे पाहावे लागेल.

Avesh Khan

आवेश खानलाही ताप आल्यामुळे आशिया चषकातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून आवेश खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात ५० हून अधिक धावा दिल्या होत्या. पण त्याची तब्येतही भारतीय संघासाठी चिंतेचे कारण आहे.

prasidh krishna

न्यूझीलंड-ए विरुद्धच्या सध्याच्या मालिकेसाठी प्रसिद्ध कृष्णा भारत-अ संघात खेळत आहे. पण पाठीच्या दुखापतीमुळे कृष्णाला या मालिकेतून माघार घ्यावी लागली. आता कृष्णाच्या बाहेर पडल्यानंतर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा भारत-अ संघात समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT