क्रीडा

"तर टीम इंडिया कसोटी चॅम्पियनशीप जिंकणं कठीणच"

विराज भागवत

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC Finals) 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये

लंडन: भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये पहिलीवहिली कसोटी अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर १८ ते २२ जून या कालावधीत WTC Final सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. भारताच्या संघात सर्वोत्तम फलंदाजांचा भरणा आहे, पण तरीदेखील या सामन्यात भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडू शकते असा अंदाज इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पनेसार याने व्यक्त केला आहे. (Team India will struggle in WTC Final if conditions favours Pace Bowlers Says Monty Panesar)

"सध्या इंग्लंडमध्ये भरपूर पाऊस पडतोय. जर असाच पाऊस सुरू राहिला आणि वातावरण बदललं नाही तर WTC Finals मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्या वेगवान गोलंदाजांमधील द्वंद्व पाहायला मजा येईल. स्विंग होणारा चेंडू टोलवण्यात भारतीय फलंदाजांपेक्षा न्यूझीलंडचे गोलंदाज माहीर आहेत. त्यामुळे कसोटीच्या एखाद्या दिवसाच्या खेळात जेव्हा चेंडू स्विंग होऊ लागेल तेव्हा हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरेल की भारतीय फलंदाज तशा गोलंदाजीचा सामना कशाप्रकारे करतात. पण खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असेल, तर मात्र भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद जिंकणं काहीसं कठीण आहे", असं स्पष्ट मत माँटी पनेसार याने व्यक्त केलं.

"कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना ज्या मैदानावर होणार आहे त्या मैदानात अत्यधुनिक सुविधा आहेत. पाऊस पडल्यानंतर मैदानावरील सर्व पाणी लवकर निघून जाईल आणि मैदान पुन्हा लवकरात लवकर खेळण्यायोग्य होईल अशी सिस्टीम त्यात आहे. अशा परिस्थितीत खेळ चौथ्या किंवा पाचव्या दिवसापर्यंत नक्कीच लांबला जाऊ शकतो. अशा वेळी भारत जाडेजा व अश्विन या दोन फिरकीपटूंसह तीन वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरेल अशी मला खात्री आहे. वातावरण जर निरभ्र असेल, तर भारतीय संघ नक्कीच न्यूझीलंडपेक्षा वरचढ ठरेल", असेही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT