icc odi ranking team India winning the Asia Cup 2023 but Pakistan has regained the No-1 ODI  
क्रीडा

ICC ODI Ranking : टीम इंडियाने जिंकला आशिया कप, तरी पाकिस्तान बनला ODI मध्ये नंबर वन? जाणून घ्या गणित

Kiran Mahanavar

ICC ODI Ranking : भारतीय क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून आशिया कप 2023चे विजेतेपद पटकावले. मात्र, जेतेपद जिंकल्यानंतरही टीम इंडियाला आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचता आले नाही.

तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर राहण्याची सुवर्णसंधी होती, पण बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर ही संधी गमावली. मात्र दरम्यान पाकिस्तान संघाने वनडे क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. आशिया कप सुपर फोरमध्ये सलग पराभव पत्करून आणि त्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडलेला पाकिस्तानचा संघ वनडेचा नंबर वन संघ कसा बनला? जाणून घ्या गणित...

आशिया कप सुरू झाला त्यावेळी पाकिस्तान संघ एकदिवसीय क्रमवारीत एक नंबरवर होता, परंतु टीम इंडिया आणि श्रीलंकेविरुद्धचे सामने गमावल्यानंतर त्याने प्रथम स्थानही गमावले. त्यावेळी ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर पोहोचला होता, तर टीम इंडिया त्याच्या मागे दुसऱ्या स्थानावर आला, आणि पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन एकदिवसीय सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान गाठले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकेने 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर सलग 3 एकदिवसीय सामने जिंकून मालिका जिंकली. याचे परिणाम ऑस्ट्रेलियाच्या क्रमवारीवर झाला. ऑस्ट्रेलिया क्रमवारीत खाली आली तर पाकिस्तान पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचला.

सध्या भारत आणि पाकिस्तानचे 115 रेटिंग गुण आहेत. आता पाकिस्तान आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत तर ऑस्ट्रेलिया 113 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 22 सप्टेंबरपासून 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भिडणार आहेत. ही मालिका जिंकणाऱ्या संघाला वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी असेल. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 22 तारखेला मोहाली येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया वर्ल्डकपपूर्वी मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT