Team India 2024 Full Schedule Marathi News sakal
क्रीडा

Team India 2024 Full Schedule : 2024 मध्ये टीम इंडियाचा कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध रंगणार थरार? जाणून घ्या शेड्यूल

Team India 2024 Full Schedule News | आज 2023 वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष 2024 सुरू होणार आहे...

Kiran Mahanavar

Team India 2024 Full Schedule : आज 2023 वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष 2024 सुरू होणार आहे... सर्वत्र नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे बेत आखल्या जात आहेत. कोणी मित्रांसोबत फिरायला गेले आहे, तर कोणी पार्टी करत आहे.

पण पुढील वर्ष क्रिकेटच्या दृष्टिकोनातूनही खास असणार आहे. कारण टीम इंडियाला ट्रॉफीचा दुष्काळ संपवून टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजेतेपद मिळवायचे आहे. तर यादरम्यान टीम इंडियाच्या वर्ष 2024 च्या पहिल्या 3 महिन्यांतील वेळापत्रकाबद्दल सांगूया...

जानेवारीमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत 3 ते 7 तारखेपर्यंत दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ मायदेशी परतणार आहे. जिथे, 11 जानेवारीपासून भारताला अफगाणिस्तानसोबत 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.

अफगाणिस्तान मालिकेनंतर टीम इंडियाला इंग्लंडसोबत मायदेशात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, जी 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. पण, त्याचा दुसरा सामना 2 ते 6 फेब्रुवारी, तिसरा सामना 15 ते 19 फेब्रुवारी, चौथा सामना 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकूण 3 कसोटी सामने खेळणार आहे.

जानेवारीपासून सुरू होणार्‍या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान होणार आहे. त्याच वेळी, ही मालिका संपल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग 2024 सुरू होईल. कदाचित त्यामुळेच बीसीसीआयने मार्चमध्ये भारत-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर कोणतीही मालिका नियोजित केलेली नाही.

मात्र, आयपीएलच्या 17व्या हंगामाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. परंतु वृत्तांवर विश्वास ठेवला तर, बीसीसीआय आगामी आयपीएल हंगामाबाबत लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतरच निर्णय घेईल, स्पर्धा भारतात होणार की 17 वा हंगाम भारताबाहेर आणि परदेशात आयोजित केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT