tennis  sakal
क्रीडा

Tennis Competition : भारतीय डेव्हिस चषक संघासाठी सुरक्षा कवच ; पाकिस्तानकडून कडेकोट बंदोबस्ताची ग्वाही

भारताचा डेव्हिस चषक संघ तब्बल ६० वर्षांनंतर जागतिक गट प्ले ऑफ लढत खेळायला पाकिस्तानात जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून कडेकोट बंदोबस्ताची ग्वाही देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद : भारताचा डेव्हिस चषक संघ तब्बल ६० वर्षांनंतर जागतिक गट प्ले ऑफ लढत खेळायला पाकिस्तानात जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून कडेकोट बंदोबस्ताची ग्वाही देण्यात आली आहे. भारतीय संघाला सुरक्षा कवच पुरवले जाणार आहे. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाकडून प्रतिदिन इस्लामाबाद क्रीडा संकुलाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच संरक्षक दलाच्या दोन गाड्या सातत्याने भारतीय डेव्हिस चषक संघासोबत असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेकडून भारतीय टेनिस संघाच्या सुरक्षेसाठी योजना बनवण्यात आली आहे. पाकिस्तान टेनिस संघटनेकडून याचे पालन करण्यात येणार आहे. भारतीय टेनिस संघातील खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक यांना लढतीचे ठिकाण व हॉटेल इथपर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार आहे.

भारतीयांवर यामुळे मर्यादा येतील, पण भारतीयांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे पाकिस्तान टेनिस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले. भारतीय टेनिस संघात पाच खेळाडूंचा समावेश आहे. तसेच यामध्ये दोन फिजीयो व दोन अधिकारी यांचीही निवड करण्यात आली आहे.

५०० टेनिसप्रेमींनाच प्रवेश

भारतीय टेनिस संघाच्या सुरक्षेसाठी इस्लामाबादमधील क्रीडा संकुलात फक्त ५०० टेनिसप्रेमींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. पाकिस्तान टेनिस संघटनेकडून मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धोनीचा 'Beast' मोड, ७५ लाखांची गाडी चालवताना दाखवून दिलं आर्मीप्रेम....तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

SCROLL FOR NEXT