Serena Williams announces retirement 
क्रीडा

Serena Williams announces retirement: दिग्गज टेनिसपटू सेरेनाची निवृत्तीची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : टेनिस क्षेत्रावर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारी दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने मंगळवारी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. 23 ग्रँड स्लॅम विजेती अमेरिकन खेळाडू सेरेना म्हटले की ती खेळापासून "दूर होत आहे". (Tennis legend Serena Williams announces retirement)

40 वर्षीय टेनिस स्टारने सांगितले, की ती काय करत आहे याचे वर्णन करण्यासाठी सर्वोत्तम शब्द म्हणजे "उत्क्रांती" हाच आहे. तसेच आपल्याला आता कुटुंब वाढवायचे आहे. "मला निवृत्ती हा शब्द कधीच आवडला नाही. तो मला आधुनिक शब्दासारखा वाटत नाही. मी निवृत्तीकडे संक्रमण म्हणून पाहते.

या वर्षाच्या सुरुवातीला विम्बल्डन स्पर्धेत पहिल्याच फेरीत सेरेनेचे आव्हान संपुष्टात आले होते. मात्र तिने आता यूएस ओपनवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. अखेरच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केल्याचं सेरेनाने म्हटलं आहे. अर्थातच ती युएस ओपननंतर निवृत्त होणार आहे.

सेरेना पुढं म्हणाली की, "दुर्दैवाने मी यावर्षी विम्बल्डनसाठी तयार नव्हते. मला हेही माहित नाही की मी युएस ओपन जिंकण्यासाठी तयार आहे की नाही. पण मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.

सेरेनाने कारकिर्दीत एकेरीमध्ये 23 ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत, जे खुल्या स्पर्धेतील एका खेळाडूने जिंकलेले सर्वाधिक आहेत. सेरेना महिला टेनिसच्या क्रमवारीत सलग ३१९ आठवडे अव्वल होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT