Tennis Player Ashleigh Barty Cricket Connection  esakal
क्रीडा

Ashleigh Barty | क्रिकेटपटू अ‍ॅश्ले बार्टी कशी झाली टेनिसची सम्राज्ञी?

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी (Ashleigh Barty) म्हणजे गुणवत्तेची खाण आहे. इथे पोरांना एक खेळ धड खेळता येत नाही. मात्र बार्टीने तर दोन दोन खेळात प्राविण्य मिळवले. नुकतीच अ‍ॅश्ले बार्टीने व्यावसायिक टेनिसमधून (Tennis) अचानक निवृत्ती (Retirement) घेतल्याचे जाहीर केले. यामुळे अनेक क्रीडा रसिकांना धक्का बसला असेल. मात्र बार्टीचा पूर्वइतिहास ज्यांना माहिती आहे त्यांच्यादृष्टीने ही फार धक्कादायक गोष्ट नाही. कारण बाल्यावस्थेत हातात रॅकेट घेणाऱ्या बार्टीने 2014 मध्ये ही रॅकेट सोडली होती आणि क्रिकेटची (Cricket) बॅट हातात घेतली होती.

अ‍ॅश्ले बार्टीने वयाच्या 16 व्या वर्षी टेनिसमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. ब्रेक घेण्यापूर्वी बार्टीने 2011 ला तिने मुलींच्या एकेरी विंम्बल्डनचा (Wimbledon) खिताब आपल्या नावावर केला होता. त्यानंतर 2013 ला WTA डबल्समध्येही चांगले यश मिळवले होते. तिने तीन ग्रँडस्लॅम डबल्सची उपविजेती राहिली होती. मात्र त्यानंतर बार्टीने ब्रेक घेतला आणि क्रिकेटकडे वळली. तिथेही तिने बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) आपली चमक दाखवली. ती पहिल्या वहिल्या बीग बॅश लीगमध्ये ब्रिसबेन हीट कडून खेळली होती. विशेष म्हणजे बार्टीने क्रिकेटचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते.

मात्र बार्टी क्रिकेटमध्ये फार काळ रमली नाही. ती 2016 ला पुन्हा टेनिसकडे वळली. एकेरी तसेच दुहेरीमध्ये खेळत बार्टीने पुन्हा टेनिसमध्ये आपले बस्तान बसवले. पुनरागमनानंतर तिने 2018 ला आपले पहिले प्रीमियर मँडेटरी आणि ग्रँड स्लॅम डबल्स टायटल जिंकले. यानंतर बार्टीने मागे वळून पाहिले नाही. तिने 2019 ला सिंगल्समध्ये फ्रेंच ओपनवर आपले नाव कोरले. त्यानंतर बार्टीने 2021 मध्ये तब्बल पाच विजेतेपदं पटकावली. याच विंम्बल्डनसारख्या प्रतिष्ठित ग्रँड स्लॅमचाही समावेश होता. त्यानंतर 2022 ला बार्टीने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) जिंकून तिसऱ्या ग्रँडस्लॅमवर आपले नाव कोरले.

कारकिर्दीच्या सर्वोच्च उंचीवर असतानाच आज ( दि. 23 मार्च) बार्टीने टेनिसला अलविदा केले. अवघ्या 25 वर्षाच्या बार्टीने आता मला वेगळी स्वप्ने खुणावत असल्याचे सांगितले. अवघ्या 25 व्या वर्षापर्यंत टेनिस, क्रिकेट पुन्हा टेनिस असा प्रवास करणारी बार्टी आता पुन्हा टेनिस कोर्टवर दिसणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT