tennis player Sumit Nagal achieved career-best ranking of world No 68 in men singles category Sakal
क्रीडा

Sumit Nagal : टेनिसपटू सुमीत नागलची पाच स्थानांची प्रगती; एटीपी क्रमवारीत ६८व्या स्थानावर

भारताचा पुरुष टेनिसपटू सुमीत नागल याने एटीपी क्रमवारीत पाच स्थानांची प्रगती केली आहे. ७३व्या स्थानावरून तो आता ६८व्या स्थानावर पोहोचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली ­­: भारताचा पुरुष टेनिसपटू सुमीत नागल याने एटीपी क्रमवारीत पाच स्थानांची प्रगती केली आहे. ७३व्या स्थानावरून तो आता ६८व्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी ७१व्या स्थानांपर्यंत त्याने प्रगती केली होती. त्यामुळे आता ६८वे स्थान ही त्याची सर्वोत्तम क्रमवारी ठरली आहे.

पॅरिस ऑलिंपिकमधील टेनिस या खेळात पुरुष एकेरीसाठी पात्र ठरणारा सुमीत नागल हा भारताचा एकमेव टेनिसपटू ठरला आहे. त्याच्याकडे ७७९ एटीपी गुण आहेत. सुमीतने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कझाकस्तानच्या ॲलेक्झँडर बुबलिक याला पराभूत केले होते.

तसेच, फ्रेंच ओपन व विम्बल्डन या दोन्ही स्पर्धांमध्येही तो सहभागी झाला होता. या वर्षी जर्मनी येथे झालेल्या चॅलेंजर करंडकात त्याने पुरुष एकेरीच्या जेतेपदावरही मोहर उमटवली. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चेन्नई ओपनमध्येही त्याने यश मिळवले होते.

चौथा भारतीय टेनिसपटू

सुमीत नागल याने ६८वे स्थान पटकावत आणखी एक टप्पा ओलांडला आहे. सर्वोत्तम क्रमवारी मिळवणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी विजय अमृतराज यांनी १९८०मध्ये १८वे स्थान पटकावले होते.

रमेश क्रिशनन यांनी १९८५मध्ये २३व्या स्थानांपर्यंत मजल मारली होती. तसेच, २०११मध्ये सोमदेव देववर्मन याने ६२व्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. शशी मेनन यांनी १९७३मध्ये ७१वे स्थान पटकावले होते. सुमीत यांनी शशी यांना मागे टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Sale : डीमार्टमध्ये कोणत्या दिवशी वस्तू खरेदी करणे जास्त स्वस्त आणि फायद्याचे ठरते? जाणून घ्या एका क्लिकवर

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Sale : सारा जमाना Zudio का दिवाना! पण फक्त झुडिओ नाही, तर टाटाच्या 'या' 5 दुकानांमध्ये मिळतोय हजारोंचा डिस्काउंट; स्पेशल ऑफर्स पाहा

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

SCROLL FOR NEXT