क्रीडा

टेनिसपटूंसाठी संघटना आणखी खूप काही करू शकेल - आनंद अमृतराज 

- मुकुंद पोतदार


पुणे - व्यावसायिक टेनिस खेळणे खूप खर्चिक आहे. मला नेमके कुणाकडे बोट करायचे नाही; पण अखिल भारतीय टेनिस संघटना खेळाडूंसाठी आणखी खूप काही करू शकेल, असे मत डेव्हिस करंडक संघाचे नॉन-प्लेइंग कॅप्टन आनंद अमृतराज यांनी व्यक्त केले.

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या एमएसएलटीए हार्ड कोर्टवर न्यूझीलंडविरुद्ध भारताची आशिया-ओशेनिया गटातील लढत होणार आहे. नूतनीकरण झालेल्या हार्ड कोर्टवर संघाचा सराव झाल्यानंतर ते बोलत होते. युकी भांब्री आणि साकेत मायनेनी अलीकडेच दुखापतींमधून तंदुरुस्त झाले आहेत, तर आदिल कल्याणपूर याच्यासह अनेक खेळाडू परदेशात प्रशिक्षण घेत आहेत. अशा खेळाडूंना प्रगती करता यावी म्हणून पाठिंब्यासाठी काय शिफारशी कराल, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट भाष्य केले. ते म्हणाले, की परदेशातील स्पर्धांसाठी प्रवास करणे, प्रशिक्षण घेणे आदींसाठी बराच खर्च येतो. आपल्या खेळाडूंना मदत मिळाली तर चांगलेच होईल. संघटना, प्रायोजक किंवा कंपन्या अशा कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा.

लिअँडर पेस कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय टेनिसचे भवितव्य चांगले असल्याचे सांगून ते म्हणाले, की युकीसह साकेत व रामकुमार रामनाथन या तिघांमध्ये जागतिक क्रमवारीत टॉप हंड्रेडमध्ये येण्याची क्षमता आहे. युकीने ही कामगिरी करून दाखविली आहे, तर साकेत त्या दिशेने वाटचाल करीत आहे. रामकुमारही प्रगती करतो आहे.

आनंद अमृतराज यांची ही अखेरची लढत आहे. त्यांच्या जागी यापूर्वीच महेश भूपतीची नियुक्ती झाली आहे. मायदेशातील लढतीत विजय मिळवून कारकिर्दीची विजयी सांगता करायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. न्यूझीलंडच्या संघाला कमी लेखणार नाही. 2015 मध्ये ख्राईस्टचर्चमधील लढतीत भारतीय संघाला विजयासाठी झगडावे लागले होते. त्या वेळी न्यूझीलंडच्या संघाची क्षमता लक्षात आली होती. एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करू, असे त्यांनी नमूद केले.

युकी भांब्रीने सांगितले, की गेल्या वर्षी दुखापतीमुळे संघात नसणे आणि सामने घरी बसून बघावे लागणे निराशाजनक होते; पण आता मी तंदुरुस्त झालो असून, सर्वोत्तम खेळ करू शकेन.

न्यूझीलंडला ही लढत प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळावी लागेल. एकेरीत त्यांच्या खेळाडूंचा जागतिक क्रमवारीतील क्रमांकही भारतीय खेळाडूंच्या तुलनेत खालचा आहे. यासंदर्भात न्यूझीलंडचे कर्णधार ऍलिस्टर हंट यांनी सांगितले, की डेव्हिस करंडक लढतींमध्ये क्रमवारीला निर्णायक महत्त्व नसते. आम्ही तयारी चांगली केली आहे. हवामान, कोर्ट आमच्या खेळास अनुकूल आहे.

भारतीय संघाचे मापारी डॉक्‍टर
पुणेस्थित स्पोर्टस डॉक्‍टर अजित मापारी यांची भारतीय संघाचे डॉक्‍टर म्हणून नियुक्ती झाली आहे. ते आयएसएलमधील एफसी पुणे सिटीचे टीम डॉक्‍टर आहेत. भारतीय संघासाठी त्यांना असे पद प्रथमच मिळाले आहे.

पेसला एक दिवसाचा ब्रेक
पेसने मंगळवारी सकाळी सराव सत्रात भाग घेतला नाही. तो पत्रकार परिषदेलासुद्धा उपस्थित नव्हता. याविषयी आनंद अमृतराज यांनी सांगितले, की त्याला बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्याला आजचा दिवस ब्रेक द्यायचे आम्ही ठरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pro Kabaddi 12: यू मुंबावर युपी योद्धाज पडले भारी! पराभवामुळे टॉप-४ ची संधीही हुकली

Mumbai News: तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोसारखे धोरण! बाधितांना मोबदल्यात भूखंडही देणार

Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये परतीच्या पावसाचा जोर; कापूस शेतकऱ्यांसाठी वाढली चिंता

तुमच्याकडे गांजा आहे...! पोलिसांच्या वेशात आलेल्या पाच जणांनी महिलेवर केला सामूहिक बलात्कार; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT