The French Open sakal
क्रीडा

The French Open : इगा स्विअतेकची हॅटट्रिक ;फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत चौथे विजेतेपद

अव्वल मानांकित इगा स्विअतेकने फ्रेंच ओपन स्पर्धेत नवा पराक्रम केला. सलग तीन वेळा आणि एकूण चार वेळा विजेतेपद मिळवले. आज झालेल्या अंतिम सामन्यात तिने इटलीच्या १२ व्या मानांकित जस्मिन पौलिनी हिचा एकतर्फी पराभव केला.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : अव्वल मानांकित इगा स्विअतेकने फ्रेंच ओपन स्पर्धेत नवा पराक्रम केला. सलग तीन वेळा आणि एकूण चार वेळा विजेतेपद मिळवले. आज झालेल्या अंतिम सामन्यात तिने इटलीच्या १२ व्या मानांकित जस्मिन पौलिनी हिचा एकतर्फी पराभव केला. पोलंडच्या स्विअतेकने रोलँड गँरोवरचे आपले वर्चस्व अबाधिक ठेवले. अंतिम सामना तिने तासाभराच्या खेळात ६-२, ६-१ असा जिंकला. प्रतिस्पर्धी पौलिनी पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम अंतिम सामन्यात खेळत होती.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली इगा सुरुवातीला पाठीमागे होती; पण त्यानंतर तिने १२ पैकी ११ गेम जिंकत आपला दरारा सिद्ध केला. स्विअतेकचे हे फ्रेंच ओपन स्पर्धेतील चौथे आणि एकूण पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. २०२२ मध्ये तिने यूएस ओपन स्पर्धाही जिंकलेली आहे.

फ्रेंच ओपन स्पर्धा माझ्या फारच आवडीची आहे. येथे खेळण्याची मी वाट पाहत असते, अशी भावना स्विअतेकने विजेतेपदानंतर व्यक्त केली. १९६८ नंतर कोणत्याही स्पर्धेचे सलग तीनदा विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम करणारी स्विअतेक मोनिका सेलेस आणि जस्टीन हेनिननंतरची महिला खेळाडू आहे. स्विअतेकने विजेतेपद मिळवल्यावर गुडघ्यावर बसत कोर्टभर नृत्य करून सर्व प्रेक्षकांना आपल्या या कलेचा आविष्कार घडवला.

या फ्रेंच स्पर्धेत गेल्या १५ दिवसांत प्रगती करत आणि अंतिम सामन्यात अनुभवी खेळाडूसमोर आव्हान उभे करण्याची मला संधी मिळाली, हेच माझ्यासाठी गौरवाचे आहे, असे मत पौलिनी हिने व्यक्त केले. स्विअतेकला कोण रोखणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता; पण याचे उत्तर कोणीही देऊ शकले नाही, असेही पौलिनी म्हणाली.

स्विअतेकसमोर कोणी आव्हान देऊ शकले नाही, असे असले तरी दुसऱ्या फेरीत मात्र नाओमी ओसाकाविरुद्ध तिला शर्थ करावी लागली होती. मॅच पॉईंट वाचवत तिने विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. उपांत्य फेरीत कोको गॉफने लढा दिला होती; पण तिचा प्रतिकारही स्विअतेकने मोडून काढला.

दृष्टिक्षेपात

  • - स्विअतेकने या फ्रेंच ओपनमध्ये सलग २१ सामने जिंकण्याचा पराक्रम केला. ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग सर्वाधिक सामने जिंकणारी ती चौथी महिला टेनिसपटू

  • - रोलँड गँरोवर स्विअतेक एकूण ३७ सामने खेळली त्यात ३५ विजय

  • - फ्रेंच ओपन स्पर्धेत २०२१ नंतर स्विअतेक अपराजित

  • - ओसाकाविरुद्ध मॅच पॉईंट वाचवल्यानंतर स्विअतेकने ८१ पैकी ६४ गेम जिंकले.

  • - ख्रिस एव्हर्ट (७), स्टेफी ग्राफ (६) जस्टीन हेनिन (४) यांच्यानंतर फ्रेंच ओपनमध्ये स्विअतेक सर्वाधिक (४) विजेतेपद मिळवणारी महिला टेनिसपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT