Cricket 
क्रीडा

MCC New Rule : तो-ती साठी क्रिकेट डिक्शनरीत नवा शब्द

जेंडर न्यूट्रल शब्दाचा वापर केल्याने क्रिकेट सर्वसमावेशक

सुशांत जाधव

क्रिकेट जगतात पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटलाही व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. पुरुष आणि महिला क्रिकेट यांचा एकत्रित विचार करुन मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (The Marylebone Cricket Club) मोठा निर्णय घेतलाय. आता क्रिकेटमध्ये बॅट्समन या शब्दा ऐवजी आता बॅटर आणि बॅटर्स या शब्दाचा वापर केला जाणार आहे. जेंडर न्यूट्रल शब्दाचा वापर केल्याने क्रिकेट सर्वसमावेशक होईल. त्याच दिशेने छोटे पाऊल टाकले आहे, असे एमसीसीचे सहाय्यक सचिव एमी कॉक्स यांनी म्हटले आहे. यासोबतच फिल्डर आणि बॉलर या शब्दावर जैसे थे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने 2017 मध्ये महिला क्रिकेट फलंदाजांना काय म्हणावे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासाठी महिला क्रिकेटमधील दिग्गजांशी चर्चाही करण्यात आली होती. 2017 मध्ये इंग्लंडच्या विश्व विजेत्या संघाची सदस्य आणि लंकाशायरची कर्णधार एलेक्स हर्टली हिने एमसीसीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिकेट हा गेम सर्वांसाठी आहे. त्यामुळे हा निर्णय छोटा असला तरी सकारात्मक दिशेनं उचललेले महत्त्वाचे पाऊल वाटते, असे तिने म्हटले आहे. तिने क्रिकेटमधील आणखी काही शब्द बदलण्याची सूचनाही केलीये. फिल्डिंग प्लेसवेळी थर्डमॅन या शब्दा ऐवजी थर्ड तर नाईट वॉचमन शब्दाऐवजी नाईट वॉचर असा शब्द करावा, असे तिने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rules From 1st Nov : 1 नोव्हेंबेरपासून तुमच्या खिशाला कात्री; आधार कार्डपासून बँक अकाऊंटपर्यंत 'हे' 5 नियम बदलणार, एकदा बघाच

Latest Marathi News Live Update : "डोके जागेवर येण्यासाठी हंडा-कळशी भेट!" — शिवसेना उबाठाचे आगळंवेगळं आंदोलन

Rohit Sharma ने जिंकला आणखी एक पुरस्कार; गौतम गंभीरचं RO-KO बद्दल मोठं विधान, म्हणाला...

बाबो...! क्रिती सनॉनचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा 8 वर्षाने लहान, शेअर केले फोटो, नेटकरी म्हणाले...'क्युट जोडी'

Shreyas Iyer Injury Update: श्रेयसला ICU मध्ये हलवलं; बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे झालाय आंतरिक रक्तस्राव, डॉक्टर म्हणतायेत...

SCROLL FOR NEXT