wrestling  sakal
क्रीडा

निलंबनाचा निर्णय मागे घेण्यासाठी पाऊल ; नवीन कुस्ती संघटना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करणार

भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून निवडण्यात आलेल्या हंगामी समितीकडे भारतीय कुस्ती संघटनेची सूत्रे तात्पुरती सोपवण्यात आली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेच्या नव्या कार्यकारिणीला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून निलंबित करण्यात आले. त्यामुळे भारतातील कुस्ती खेळामधील वाद कायम असल्याचे समोर आले. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून निवडण्यात आलेल्या हंगामी समितीकडे भारतीय कुस्ती संघटनेची सूत्रे तात्पुरती सोपवण्यात आली आहेत.

याच पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती संघटनेच्या नव्या कार्यकारिणीने त्यांच्यावरील निलंबनाचा निर्णय मागे घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे; पण चर्चेनंतरही दोघांमधील संवाद फिसकटला, तर कायदेशीर पर्यायाकडे वळणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

निलंबित भारतीय कुस्ती संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. संजय सिंह याप्रसंगी म्हणाले, आम्ही केंद्र सरकारविरोधात जाणार नाही. याआधी त्यांच्यासोबत बोलणी करण्यात येतील. त्यांच्याकडून वेळ मागण्यात येईल. त्यानंतर आमचे पदाधिकारी सरकारी मंडळीशी संवाद साधतील. त्यामुळे सध्या तरी न्यायालयात जाण्याचा विचार नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

संजय सिंह पुढे सांगतात की, जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघटनेला निलंबित केले होते. त्या वेळी आमच्याकडून वेळेत निवडणूक घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्हाला निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हे कारण आम्हाला माहीत होते. पण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कोणत्या कारणामुळे निलंबित करण्यात आलेले आहे, हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे संवाद साधणे महत्त्वाचे आहे.

कुस्ती संघटनेकडे स्पर्धा आयोजनाचे अधिकार

भारतीय कुस्ती संघटनेकडून पुण्यात राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हंगामी समितीकडूनही राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन जयपूर येथे करण्यात आले आहे. दोन संघटना व दोन स्पर्धा याबाबत संजय सिंह याप्रसंगी स्पष्ट म्हणाले की, स्पर्धा आयोजनाचे अधिकार भारतीय कुस्ती संघटनेकडे आहेत. संघटनेशी संलग्न असलेल्या २५ राज्य संघटनांकडूनही याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पत्राद्वारे कळवण्यात आलेले आहे. काही कुस्तीपटूंनी पुण्यातील स्पर्धेसाठी तिकीट बुकही केले आहे.

कुस्तीचे नुकसान

झॅगरेबमधील स्पर्धेत मर्यादित कुस्तीपटूंना सहभागी होता आले. अमन याने त्या स्पर्धेत पदक जिंकले. पण जागतिक कुस्ती संघटनेकडून निलंबित असल्यामुळे पदक सोहळ्याप्रसंगी राष्ट्रगीताचा सूरही ऐकायला मिळाला नाही. भारतीय कुस्ती व कुस्तीपटूंसाठी ही चांगली बाब नव्हे. नुकसान होत आहे, असे संजय सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात; चार वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT