The United World Wrestling has lifted the suspension on the Wrestling Federation of India with immediate effect  
क्रीडा

Wrestling Federation of India : युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा मोठा निर्णय! भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन घेतलं मागे

Wrestling Federation of India : युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन तात्काळ उठवले आहे.

रोहित कणसे

Wrestling Federation of India : युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन तात्काळ मागे घेतलं आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेतल्याचे कारण यासाठी देण्यात आले होते. या संदर्भात युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निलंबित करण्यात आले होते. कारण भारतीय संस्था वेळेवर निवडणुका घेण्यात अयशस्वी ठरली होती. UWW शिस्तपालन चेंबरने निर्णय घेतला होता की महासंघावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे. कारण फेडरेशनमधील ही परिस्थिती कमीत कमी सहा महिने जैसेथे अशीच होती.

दरम्यान निलंबनाचा आढावा घेण्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अधिकाऱ्यांनी काही अटी घालत निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

UWW ने भारतीय कुस्ती महासंघाला त्यांच्या ऍथलीट आयोगाच्या निवडणुका पुन्हा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात असे नमूद केले आहे की या आयोगासाठी उमेदवार सक्रिय क्रीडापटू असणे आवश्यक आहे किंवा चार वर्षांहून अधिक काळ सेवानिवृत्त झालेला नसावा. मतदार विशेषतः खेळाडू असतील. या निवडणुका 1 जुलै 2024 नंतर कोणत्याही वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान घेतल्या जातील.

आदेशात पुढे म्हटले आहे की, WFI ताबडतोब UWW ला लेखी गॅरंटी देईल की सर्व कुस्तीपटूंना सर्व WFI स्पर्धांमध्ये विशेषत: ऑलिम्पिक खेळ आणि इतर कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणताही भेदभाव न करता भाग घेण्याची परवानगी दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT