Euro Cup Football Tournament sakal
क्रीडा

Euro Cup Football Tournament: ऑस्ट्रियाचा स्वयंगोल फ्रान्ससाठी मौल्यवान;युरो करंडक प्रशिक्षक दिदिए देशॉ यांच्या मार्गदर्शनाखाली शतकी विजय

ऑस्ट्रियाचा कडवा प्रतिकार फ्रान्ससाठी खडतर ठरला, मात्र अखेरीस प्रतिस्पर्ध्यांच्या स्वयंगोलच्या बळावर माजी विजेत्यांनी युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात विजयी सलामी दिली.

सकाळ वृत्तसेवा

ड्युसलडॉर्फ : ऑस्ट्रियाचा कडवा प्रतिकार फ्रान्ससाठी खडतर ठरला, मात्र अखेरीस प्रतिस्पर्ध्यांच्या स्वयंगोलच्या बळावर माजी विजेत्यांनी युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात विजयी सलामी दिली. फ्रेंच संघाचा हा प्रशिक्षक दिदिए देशॉ यांच्या मार्गदर्शनाखालील शंभरावा विजय ठरला.

सामन्याच्या ३८ व्या मिनिटास फ्रेंच कर्णधार किलियन एम्बाप्पे याच्या क्रॉस फटक्यावर चेंडू ऑस्ट्रियाचा बचावपटू मॅक्झिमिलियान वोबर याच्या डोक्याला आपटून गोलनेटमध्ये घुसला. हाच हेडिंग गोल अखेरीस दोन वेळच्या माजी विजेत्यांसाठी मौल्यवान ठरला. यावेळी एम्बाप्पेने ऑस्ट्रियाच्या बचावपटूंना चकवा देत जबरदस्त मुसंडी मारली होती.

सामन्याच्या ५५ व्या मिनिटास समोर केवळ गोलरक्षक पॅट्रिक पेंट्झ याचाच अडसर असताना एम्बाप्पे अचूक फटका मारू शकला नाही, त्यामुळे फ्रान्सची आघाडी एका गोलपुरती मर्यांदित राहिली. शिवाय मार्कुस थुरम व ओसुमाने देम्बेले यांचे प्रयत्नही विफल ठरले. ३७ व्या मिनिटास ऑस्ट्रियाच्या ख्रिस्तोफ बॉमगार्टनर याचा फटका सत्कारणी लागला नाही. त्यामुळे फ्रान्सला क्लीन शीट राखता आली.

युरो लढतीपूर्वी १६ लढतीत फक्त एकच सामना गमावलेल्या राल्फ रांगनिक यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने फ्रान्सला सोमवारी रात्री चांगलेच झुंजविले, मात्र त्यांची सात सामन्यांची अपराजित मालिका खंडित झाली. युरो स्पर्धेत तीन वर्षांपूर्वी फ्रान्सचे आव्हान राऊंड १६ फेरीत संपुष्टात आले होते. दोन वर्षांपूर्वी विश्वकरंडक स्पर्धेत उपविजेते ठरलेल्या देशॉ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला जर्मनीतील युरो करंडकात आणखी मेहनत घ्यावी लागेल, हे ऑस्ट्रियाविरुद्धच्या कामगिरीद्वारे स्पष्ट झाले. ड गटात आता नेदरलँड्स व फ्रान्सचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. या गटात २१ जून रोजी पोलंड व ऑस्ट्रिया यांच्यात, तर २२ जून रोजी नेदरलँड्स व फ्रान्स यांच्यात लढत होईल.

एम्बाप्पेच्या दुखापतीची चिंता

फ्रान्सने युरो करंडक मोहिमेतील पहिला सामना जिंकला असला, तरी २५ वर्षीय कर्णधार किलियन एम्बाप्पे याच्या दुखापतीची चिंता संघाला सतावत आहे. एम्बाप्पे फ्रान्सचा आक्रमणातील हुकमी एक्का आहे. त्याने अजून युरो करंडकात गोल नोंदविलेला नाही. ऑस्ट्रियाविरुद्धच्या लढतीत त्याच्या नाकाला दुखापत झाली. सामन्याच्या अंतिम टप्प्यात देशॉ यांनी त्याच्या जागी बदली खेळाडू मैदानात पाठवला. `(त्याचे) नाक अजिबात चांगले नाही. जरी फक्त नाकच असले, तरी आजच्या रात्रीसाठी ती आमच्यासाठी खूप मोठी नकारात्मक बाब आहे,` अशी भीती सामन्यानंतर देशॉ यांनी व्यक्त केली.

आघाडी वाढविण्याच्या संधी आम्ही गमावल्या असल्या, तरी खेळाडूंच्या एकंदरीत कामगिरीने आनंदी आहे. खेळ परिपूर्ण नव्हता, पण आम्ही भक्कम ठरलो. आक्रमणात आम्ही अधिक कार्यक्षम ठरू शकलो असतो, पण विजयाची सुरुवात करणे चांगलेच आहे.

-दिदिए देशॉ, फ्रान्सचे प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT